कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरणसुरक्षितता, आरोग आणि पर्यावरण

सुरक्षितता वैशिष्ट्य़े

आमची सुरक्षितता वैशिष्ट्य़े:

 • मूलभूत स्टील पाइपिंग ग्रीड आणि एमडीपीइ गॅस वितरण जळ्यात इनबिल्ट सुरक्षितता वैशिष्ट्य़े राबविण्यात आली आहे.
 • डिस्ट्रीक्ट रेग्युलेशन स्टेशन(डीआरएस): दाब १९ बारवरून ४ बार पर्यंत कमी करण्यासाठी वापरले जाणारे साधन.
 • सर्विस रेग्युलेटर(एसआर): दाब ४ बारवरून ०.१ बारपर्यंत कमी करण्यासाठी वापरले जाणारे साधन
 • मीटर रेग्युलेटर: दाब ०.१ बारवरून २१ एमबारपर्यंत कमी करण्यासाठी आणि स्वयंपाकघरात बसविले जाणारे साधन.
 • सिटी गेट स्टेशनमध्ये प्राप्त होणाऱ्या गॅसच्या १९००० एमबार दाबा समक्ष उपकरणातील दाब २१ एम बार असतो.
 • एमजीएलच्या पद्धतीच्या संहितेप्रमाणे पाइपलाइन्स टाकण्यात आल्या आहेत.
 • स्टील पाइपलाइनमध्ये कॅथोडिक संरक्षणाव्यतिरिक्त पीइ कोटिंगच्या ३ थरांच्या स्वरुपात जगात उपलब्ध असलेले उत्तम गंज संरक्षक तंत्र वापरण्यात आले आहे.
 • गॅस पाइपलाइनच्या वर ३०० मिमीवर "धोका, खाली गॅस मेन आहे" अशी इशारा पट्टी लावण्यात आली आहे.
 • मोक्याच्या ठिकाणी गॅस आयसोलेशन वाल्व बसविण्यात आले आहेत.
 • पाइपलाइनला तृतीय पक्षाकडून होणारी हानी टाळण्यासाठी मोटरसायकल स्वारांकडून गॅसच्या जाळ्यावर नियमित पहारा/गस्त.
 • सिटी गेट स्टेशन, डिस्ट्रीक्ट रेग्टुलेटिंग स्टेशन्स आणि सर्विस रेग्युलेटर्समध्ये स्वयंचलित अति दाब आणि कमी दाब शटऑफ बसविण्यात आले आहेत.