कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमसीएसआरसीएसआर पुढाकार

इतरः

आणखी सीएसआर पुढाकारः

  • एमजीएलच्या पुनर्वसन पुढाकाराचे कामकाज म्हणून मुंबईत नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना सीएनजी विक्री केंद्रांचे वाटप करण्यात आले.
  • दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
  • एक राष्ट्रीय जबाबदारी म्हणून, एमजीएलने पूर, भूकंप वगैरेंसारख्या नैसर्गिक आपत्तीतील पिडीतांच्या मदतीत योगदान दिले आहे.
  • गरजू महिलांना उदरनिर्वाहाचे साधन पुरविण्यासाठी त्यांना शिलाई यंत्रांचे वितरण करण्यात आले.
  • समुदायाच्या कल्याणासाठी आणि भारतीय कलेच्या आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी कला आणि सांस्कृतिक उपक्रमांना मदत केली जाते.
  • ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या आरोग्याची आणि कल्याणाची चिंता म्हणून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत स्पायरोमेट्री (फुप्फुसाच्या कार्याची चाचणी) आणि जागरुकता शिबीर, डोळे तपासणी शिबीर वगैरेंचे आयोजन करण्यात आले.
  • तंबाखूच्या हानीकारक परिणामांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
  • जनतेच्या सोयीसाठी नवी मुंबई आणि ठाण्याच्या सार्वजनिक उद्यानांसाठी उद्यानातील बांके पुरविण्यात आली.
  • मुंबईतील रहदारी सुलभ होण्यासाठी रस्ता दुभाजक पुरविण्यात आले.
  • पोलीस खात्यातील महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी विशेष कक्षासाठी पायाभूत संरचनेची मदत करण्यात आली.
  • 'महासुरक्षा योजना', एमजीएलचा अद्वितीय समाजिक पुढाकाराचा, जो सीएनजी वाहनांच्या चालकांना (रिक्षा आणि टॅक्सीज्) ग्रुप पर्सनल अॅक्सिडेंट छत्र पुरवितो, भारताच्या आदरणीय पंतप्रधानांद्वारे आरंभ करण्यात आला.
  • वाहतूक पोलीसांच्या कल्याणासाठी ट्रॅफीक बूथ्स आणि पोलीस शेल्टर केबीन.