कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरणसुरक्षितता, आरोग आणि पर्यावरण

ग्राहक सुरक्षितता तपासणी सूची

तुमची सुरक्षितता ही आमची चिंता आहे

एक सोयीस्कर, स्वच्छ आणि बहुआयामी इंधन असलेल्या नैसर्गिक वायूच्या लाभांचा तुम्ही पुरेपूर उपभोग घ्यावा असे आम्हाला वाटते. पण सर्व इंधनांप्रमाणेच त्याच्या सुरक्षिततेची आणि कार्यक्षमतेची खात्री करण्यासाठी हुशारीने हाताळला पाहिजे.

रोजच्या कामकाजांसाठी सावधगिरी

  • हॉट प्लेट प्रज्वलित करण्यापूर्वी, गॅसचा वास येत नसल्याची खात्री करा.
  • रबरी ट्यूब चांगल्या स्थितीत आहे आणि हॉट प्लेट/गॅस स्टोवला आणि उपकरणाच्या वाल्वला व्यवस्थित बसविलेली आहे याची खात्री करा.
  • आधी उपकरणाचा वाल्व उघडा, नंतर हॉट प्लेटचा/गॅस स्टोवचा नॉब चालू करा आणि ताबडतोब बर्नर प्रज्वलित करा.
  • गरम भांडी/गरम वस्तूंचा रबरी ट्यूबला स्पर्श होता कामा नये.
  • स्वयंपाक झाल्यानंतर उपकरणाचा वाल्व बंद करायची सवय लावून घ्या.
  • पीएनजीत रुपांतरित केलेला बर्नर एलपीजीवर वापरू नका.
गॅस सुरक्षितता जागरुकता चित्रपट पहा.