बिलिंगची कार्यपद्धती काय आहे?
प्रत्येक ग्राहकाला एक अनोखा बीपी (बिझनेस पार्टनर) आणि सीए (कांटॅक्ट अकाउंट) नंबर) दिला जातो. तसेच प्रत्येक ग्राहक विशिष्ट विभागात येतो.
देयके दोन महिन्यांतून एकदा तयार केली जातात. ग्राहकाचे पहिले देयक प्रत्यक्षात घेतलेल्या मीटर रिडिंगच्या आधारे तयार केले जाते. त्यानंतर एक निर्धारित देयक दोन महिन्यानंतर पाठवले जाते ज्यानंतर परत एकदा प्रत्यक्ष देयक. हा क्रम एका आड एक पाळला जातो.
माझे तयार केलेले देयक प्रत्यक्ष आहे की निर्धारित?
एखाद्या प्रत्यक्ष देयकाच्या बाबतीत, विशिष्ट तारखेला मीटरवर दर्शविलेले नेमके रिडींग घेतले जाते आणि ते देयकात प्रतिबिंबीत होते. रिडींग उपलब्ध नसेल तर, पर्यायाने अंदाजाच्या आधारे देयक तयार केले जाते. या बाबतीत, देयकात दिलेल्या युनीटस् बरोबर शब्द (E) नमूद केला जातो.
निर्धारित देयकाच्या बाबतीत, शब्द (A) देयकता दिलेल्या रिडींग युनीटस् बरोबर नमूद केला जातो. त्या व्यतिरिक्त, देयकावर 'निर्धारित' असेही नमूद केले जाते.
प्रत्यक्ष देयकाचा कालावधी?
मीटर रिडींग चार महिन्यांतून एकदा घेतले जाते. रिडींग उपलब्ध असेल तर, देयके त्यानुसार केली जातात. रिडींग उपलब्ध नसेल तर, देयके अंदाजाच्या(गेल्या तीन प्रत्यक्ष रिडींग्सच्या आधारे) आधारे केली जातात.
ग्राहकाला तीन प्रत्यक्ष देयके मिळाली नाहीत तर, दोन बिलिंग चक्रांच्या दरम्यानच्या दिवसांच्या संख्येसाठी गॅसच्या वापराचा हिशोब करण्यासाठी दर दिवशी ०.५०एससीएम ची प्रमाणित सरासरी वापरली जाते.
प्रत्यक्ष रिडींग एखादा ग्राहक कळवू शकतो का?
होय, ग्राहकाला त्याच्या/तिच्या बिलिंग चक्राची(प्रत्यक्ष किंवा निर्धारित) चांगली माहिती असेल तर, प्रत्यक्ष रिडींग फोनवरून किंवा
इमेलद्वारे, बिलिंग चक्राच्या सात दिवस आधी कळवले जाऊ शकते. to 9223555557
amr@mahanagargas.com वर इमेल पाठवा, किंवा 18002669944 (टोल फ्री) / (022)-68759400 / (022)-24012400 वर कॉल करा
लॉग इन करा आणि तुमचे मीटर रिडींग द्या
कृपया नोंद घ्या. वैध ओळखपत्र असलेल्या मीटर रीडर्सना मीटर रिडींग घेऊ द्यावे. मीटर रीडर्स आपल्याबरोबर स्मार्ट फोन हँड हेल्ड टर्मिनल ठेवतात. तुमच्या निवासस्थानी मीटर रीडरला प्रवेश देण्यापूर्वी कृपया पुढील बाबी तपासा- वैध ओळखपत्र, एमजीएलने दिलेले अधिकार पत्र आणि एमजीएल नॉन-एम्प्लॉयी आयडी कार्ड.
एखाद्या ग्राहकाचे बिलिंग चक्र?
कृपया बीपी क्र. किंवा सीए क्र. पुरवा आणि बिलिंग अनुसूची त्यानुसार पुरवली जाईल.
देयकांची पोचवणी?
एमजीएल तिच्या सर्व ग्राहकांना गॅस देयकांच्या पोचवणीची खात्री करते. टपाल विभागाची उत्तम सेवा आणि त्यांना शहरातील ठिकाणांची असलेली चांगली प्रत्यक्ष माहिती लक्षात घेऊन पोचवणीचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.
देयकाच्या तारखे व्यतिरिक्त, पोचवणीची तारीख सुद्धा देयकात नमूद केलेली असते. देयके कामकाजाच्या पाच टपाली दिवसांच्या आत पोचणे अपेक्षित असते.
तुम्हला देयके मिळत नसतील तर, "इ-बील सुविधा" सक्रिय करा.
तुमचा पत्ता तपासा आणि कस्टमर केअरशी ताबडतोब संपर्क करून तुमचा इमेल आयडी अपडेट आणि संपर्क क्रमांक अपडेट करा.
"इ-बील" सुविधा काय आहे?
ग्राहकाची इच्छा असेल तर, देयके इ-मेल द्वाराही पाठवली जातात. ही सुविधा मिळवण्यासाठी, ग्राहकाने आपला इ-मेल आयडी देऊन एमजीएलकडे नोंदणी करावी.
देयकाच्या प्रदानाच्या पद्धती काय आहेत?
खील सूचीत दिल्याप्रमाणे विविध पद्धतींचा वापर करून प्रदाने करता येतील.:
ड्रॉप बॉक्स सुविधा
पुढील एजन्सीज्/बँकांची ओळख पटविणाऱ्या कोणत्याही सोयीस्कर ठिकाणच्या ड्रॉप बॉक्समध्ये धनादेश किंवा डिमान्ड ड्राफ्ट टाका. (ड्रॉप बॉक्सेसची ठिकाणे पाहण्यासाठी प्रत्येकावर क्लिक करा)
- आयसीआयसीआय बँक,
- स्काय बॉक्स,
- एमएनसी बॉक्सेस,
- स्टँडर्ड चार्टर्ड बँक,
- अॅक्सिस बँक,
- धनलक्ष्मी बँक,
- ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स.
काउंटरवर
टपाला कार्यालये,,
(रोख प्रदाने करता येतात. काउंटर सोडण्यापूर्वी पावती देण्यात आली आहे याची कृपया खात्री करा.)
- पंजाब नॅशनल बंक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन बँक.
इझी बील आणि सुविधा केंद्रे
प्रदाने या केंद्रांवर सुद्धा करता येतात. (रोख प्रदानांच्या बाबतीत, काउंटर सोडण्यापूर्वी पावती देण्यात आली आहे याची कृपया खात्री करा.)
गॅसच्या देण्यांसाठी धनादेश किंवा डिमान्ड ड्राफ्ट कसा काढावा?
धनादेश ''महानगर गॅस लिमिटेड ए/सी(राज्य सीए क्र.)'' च्या नावे काढण्यात यावा. कृपया धनादेशाच्या मागील बाजूवर मोबाइल क्रमांक लिहा.
विक्री करार आणि विद्युत देयकाची प्रत पुरवली जाऊ शकते.
सध्या, नावात बदल/बॉहस्तांतरणाच्या बाबतीत, रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) चा आकार लागू होतो. या रकमेसाठी ''महानगर गॅस लिमिटेड'' च्या नावे डिमान्ड ड्राफ्ट काढण्यात यावा.
देयकात नमूद केलेल्या पत्त्यात दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी ऑनलाइन विनंती करता येते का?
देयकातील कोणत्याही सुधारणेसाठी अनुसरायची पद्धती?
कोणतीही सुधारणा लेखी देण्यात यावी. त्यासाठी पुरावा पुरविण्यात यावा.
नावातील बदल/हस्तांतरणाच्या बाबतीत सादर करायचे दस्तऐवज?
विक्री करार आणि विद्युत देयकाची प्रत पुरवली जाऊ शकते.
सध्या, नावात बदल/बॉहस्तांतरणाच्या बाबतीत, रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) चा आकार लागू होतो. या रकमेसाठी ''महानगर गॅस लिमिटेड'' च्या नावे डिमान्ड ड्राफ्ट काढण्यात यावा.
नाव हस्तांतरणासाठी अटी?
नाव हस्तांतरण साधारणपणे पुढील बाबतीत होतेः
- बिल्डरकडून घराचा ताबा (पहिला खेरदीदार).
- कायदेशीर वारसा हक्काने.
- नावात बदल होण्यात परिणत होणारा पुनर्विक्री आणि खरेदी करार.
पहिल्या दोन प्रकरणांत, नाव हस्तांतरण आवश्यक पुराव्यासहित विहीत नमुन्यातील अर्ज सादर करण्याच्या अधीन केले जाते.
सदनिकेच्या विक्रीच्या पायी नाव हस्तांतरणासाठी, खरेदीदार आणि विक्रेता, उभयतांनी दस्तऐवजावर सह करावी लागते आणि रु. २५०/- ची रक्कम जमा करावी लागते.
एकदा गॅसची देणी पूर्णपणे दिल्यानंतर एमजीएल आवश्यक ते बदल करेल. त्यामुळे, गॅस प्रदान देय असेल तर, यथायोग्य प्रकारे भरलेल्या नाव हस्तांतरण प्रपत्राबरोबर ते प्रदान करण्यात यावे.
गॅस देयके न मिळणे
एमजीएल तिच्या ग्राहकांना त्यांच्या त्यांच्या बिलिंग चक्रानुसार देयके मिळतील याची खात्री करते.
सदर कालावधीसाठी ग्राहकाला देयक न मिळण्याच्या बाबतीत, आमच्या कस्टमर केअरला १९१७ वर संपर्क करता येऊ शकेल किंवा support@mahanagargas.com ला एक इमेल पाठवली जाऊ शकेल. देयकाची दुसरी प्रत पुरविण्यात येईल.
ग्राहकाला अजूनपर्यंत गॅसच्या वापरानुसार देयक देण्यात आले नसेल तर काय करावे?
कृपया पत्ता आणि संपर्क क्रमांकाचा संपूर्ण तपशील support@mahanagargas.com ला इमेल मार्गे पुरवावा. विषयाच्या जागी कृपया तक्रारीचे स्वरुप नमूद करा उदा.
गॅस वापरला जात आहे, पण अजून एकही देयक मिळाले नाही - या बाबतीत कृपया विषय. ''कनेक्टेड, नॉट येटरिसिवड् फर्स्ट बील'' नमूद करावा.
ग्राहक रहात नसल्यामुळे गॅस वापरत नसल्यास काय करावे?
कृपया एमजीएलला गॅस वापरला जाणार नाही अशा दिवसांची/महिन्यांची संख्या नमूद करून लेखी कळवावे. धोरणानुसार, असा न राहण्याचा कालावध
तीन महिन्यांपेक्षा जास्त असेल तर, त्यासाठी देयक करताना ''किमान आकार'' लागू होतो. हेच १९१७ वर सुद्धा कळवू शकाल.
देयके न मिळण्याची कारणे?
देयके पुढील कारणांसाठी मिळू शकली नसतील:
- गॅस कनेक्शनचा तपशील एमजीएलकडे नोंदलेला नसणे
- मीटर रीडरच्या भेटीच्या वेळी दरवाजाला कुलुप असणे
तथापि, कारण "दरवाजाला कुलुप होते" असेल तर, देयक "तूटीच्या आकारासाठी भरपाई" म्हणून पाठवले जाईल. अधिक तपशीलासाठी कृपया "टॅरीफ" विभागाला भेट द्या.
एमजीएलला केलेल्या प्रदानांची पोचपावती
प्रदान टपाल कार्यालयात, सुविधा केंद्रांवर केले असेल तर, ज्य़ाला प्रदान केले ती संबंधित व्यक्ती त्यासाठी ताबडतोब पावती देईल.
एमजीएल नंतरच्या देयकात वसूल झालेल्या प्रदानाची पोच पावती देते. कोणत्याही पद्धतीमार्फत केलेल्या प्रदानाच्या पोच पावतीसाठीच्या तपशीलाकरिता, कृपय "अॅक्नॉलेजमेंट" सेक्शनला भेट द्या.
एमजीएल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम (इसीएस) ला मान्यता देते का?
होय, प्रदाने इसीएसमार्फत स्वीकारली जातात. कृपया पुढील लिंक डाउनलोड (ECS Mandate FORM) कृपया दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि यथायोग्य भरलेले प्रपत्र त्यात दिलेल्या पत्त्यावर एमजीएलला सादर करा.
प्रदानाच्या इसीएस पद्धतीचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना होणारे लाभ कोणते आहेत?
इसीएस पद्धतीचा पर्याय स्वीकारणाऱे ग्राहक पुढील लाभांना पात्र आहेत.
- एमजीएलकडे पहिल्या वेळी या पर्यायाचा वापर करताना रु. ५०/- चे क्रेडीट दिले जाईल.
- ग्राहकाच्या खात्यात गॅसच्या वापराच्या आकारावर १% सवलत जमा केली जाईल.
- गॅसच्या देण्यांप्रती वेगळया धनादेशाद्वारे प्रदान नाही.
- देय तारखेला रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यातून, एमजीएलने पुरविलेल्या इसीएस आदेशानुसार थेट वळती करून घेतली जाईल.
गॅसच्या देण्यांप्रती अग्रिम प्रदान करता येऊ शकेल का?
होय. पूर्वीच्या वापरावर आधारित देण्यांची तपासणी केल्यानंतर अंदाजाच्या आधारे अग्रिम प्रदान करता येईल.
व्हॉल्युंटरी डिपॉझीट स्कीम (व्हीडीएस) सुद्धा एमजीएलच्या ग्राहकांना दिली जाते. प्ररंभिक रु. १०००/- च्या प्रदानासह रु. ५००/- च्या पटीत प्रदान करता येईल.
जमा करता येईल अशी कमाल रक्कम आहे रु. १०,०००/-. त्यावर @ ७% द.सा. व्याज, मासिक कमी होत जाणाऱ्या शिलकीवर वर्षातून एकदा देय आहे.
इच्छुक ग्राहकांनी कृपया (VDS FORM) या लिंकचे अनुसरण करून प्रपत्र डाउनलोड करावे. यथायोग्य भरलेले प्रपत्र धनादेशासह प्रपत्रावर दिलेल्या पत्त्यावर अग्रेषित करता येईल.
व्हीडीएस रकमेचा परतावा
एखाद्या ग्राहकापाशी आता पीएजी जोडणी नाही पण व्हीडीएस खात्यात शिल्लक आहे, तो परताव्यासाठी अर्ज करू शकतो. तशाच प्रकारे. पीएनजी वापरणाऱ्या ग्राहकाला तरीही व्हीडीएस रकमेच्या परताव्याची गरज असेल तर, तो त्यासाठी विनंती करू शकतो. रक्कम मुंबई येथे सममूल्याने देय असलेल्या धनादेशाद्वारे पाठवली जाईल.
ग्राहकाला माहीत असणे महत्त्वाचे:
1. देयके द्विमासिक निर्माण केली जातात..
2. देयकांमध्ये रिडींगच्या व्यतिरिक्त, (ए) किंवा (इ) नमूद केलेले असते तेव्हा, त्याचा अर्थ एमजीएलला प्रत्यक्ष रिडींग उपलब्ध नाही असा होतो.
3. कृपया नोंद घ्या की तुम्हाला तीन वेळापेक्षा जास्त निर्धारित देयक आले असेल तर, एमजीएल नोटीस निर्गमित करेल. ग्राहकांकडून 'नो रिस्पॉन्स' च्या गैरहेजेरीत, एमजीएल
4. दिवसांची नोटीस दिल्यानंतर पुरवठा खंडित करू शकते.