कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमसीएसआरसीएसआर पुढाकार

शिक्षण

आमचा दृढ विश्वास आहे की एखाद्या देशाचे परिवर्तन करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षणाचा. म्हणून आम्ही एमजीएल मध्ये शिक्षणाला हस्तक्षेपाच्या सर्वोच्च क्षेत्रांपैकी एक म्हणून मानतो. एमजीएल उन्नती ही एमची ध्वजनौका सीएसआर हस्तक्षेप आहे ज्याखाली सामाजिक-आर्थिक दृष्ट्य़ा कमकुवत गटातील गुणवान तरुणांना प्रशिक्षण दिले जाते आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. जीवनाच्या दीर्घकालीन लक्ष्यांवर लक्ष केंद्रीत करून, भविष्याला आकार देण्यावर प्रकल्पाचा विश्वास आहे जेणेकरून अज्ञात मार्ग निश्चीत केला जाईल, काढला जाणार नाही. या पुढाकाराखाली ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यापैकी ९७% ना विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आणि २३.२% ना आयआयटीज्/एनआयटीज् मध्ये प्रवेश मिळाला आहे. एमजीएल उत्तम कामगिरी करणाऱ्यांना एक वेळची शिष्यवृत्ती सुद्धा देऊ करते.

आकाश जगताप (परिवर्तनाची गाथा....)

आकाश विनोदराव जगताप हा महाराष्ट्राच्या एका आडबाजूच्या गावातील किशोर. आडबाजूच्या गावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या आकाशपाशी असामान्य बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घेणे शक्य झाले जिथे त्याला आयुष्याच्या विविध पैलूंमधील संधींना सामोरे जाता आले. इतर विद्य्रार्थ्यांबरोबरच्या त्याच्या संवादातून त्याच्यात तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची ओढ निर्माण झाली.

त्याच्या स्वतःच्या शब्दांत आकाश म्हणतोः-

"माझा गाव फारसा विकसित नाही त्यामुळे तिथले लोक खूप शिकलेले नाहीत. गावातून १२ वी उत्तीर्ण होणारा मी पहिला मुलगा आहे. नवोदय मध माझे मित्र आयआयटीज् विषयी चर्चा करत असत आणि ते मला आवडू लागले. आयआयटीत जाणे हे माझ्यासाठी स्वप्न बनले."

दुर्दैवाने आकाशचे शिक्षण चालू असतानाच त्याचे वडिल विनोदराव जगताप मरण पावले. त्याच्या आईच्या दरमहा रु. १२,०००/- च्या उत्पन्नाने त्यांच्या जगण्याची कशीबशी सोय झाली. १२ वी पूर्ण केल्यानंतर सुद्दा आकाशला स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याकरिता कोणीतरी त्याचा हात देण्य़ाची आणि प्रशिक्षणाची गरज होती. तथापि त्याच्या आईच्या उत्पन्नाची त्या बाबतीत मदत होऊ शकत नव्हती. अशाच वेळी आकाशने 'एमजीएल उन्नती' - महानगर गॅस लिमिटेडचा एक पुढाकार जो समाजाच्या सामाजिक-आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतो, ऐकले. आकाशने एमजीएल उन्नतीसाठी प्रवेश परीक्षा दिली आणि त्याची निवड झाली. त्यानंतर होता ११ महिन्यांचा कठोर अभ्यास, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, ज्यामुळे आकाश आणि इतर १९ विद्यार्थी आयआयटी प्रवेश परीक्षा देण्यास सज्ज झाले. आघाडीवर राहून गटाचे नेतृत्व करत आकाश प्रवेश परीक्षेतून पार झाला आणि आता आयआयटी दिल्ली येथे अध्ययन करत आहे. त्याच्या यशाच्या नंतर महानगर गॅस लिमिटेडने आकाश जगताप आणि एमजीएल उन्नतीच्या इतर ३ यशस्वी विद्यार्थ्यांना एक वेळची रु. ५०,०००/- ची शिष्यवृत्ती देऊन गौरव केला.

परीक्षेतून पार झाल्यावर आकाश म्हणाला होताः-

"मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी एमजीएल उन्नतीचे आभार मानल्याशिवाय राहू शकत नाही. आता मी माझे आयआयटीयन बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मला माझ्या गावासाठी काम करायचे आहे जेणे करून तिथली मुले ज्ञान आणि संधींपासून वंचित राहता कामा नयेत."

विकासासाठी क्रीडा हा एमजीएल राबवत असलेला बालक केंद्रीत सीएसआर हस्तक्षेप आहे. प्रकल्प कृती आधारित शिकण्यावर लक्ष्य केंद्रीत करतो आणि मुंबईतील आणि आसपासच्या दोन झोपडपट्ट्यांतील १५०० हून जास्त मुलांपर्यंत पोचतो.

जागतिक जल दिन ‘पाणी वाचवा मोहीम'

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने शारदा हायस्कूल, भुवापाडा आणि आर. के. स्कूल, भुवापाडा यांच्याद्वारे अनुक्रमे २१ आणि २२ ऑगस्ट २०१६ रोजी 'पाणी वाचवा मोहीम' आयोजित करण्यात आली होती. मोहीमेचे आयोजन 'स्पोर्टस् ऑऱ डेवलपमेंट प्रोग्राम' खली करण्यात आले होते. जवळ जवळ ४०० मुले मोहीमेत सहभागी झाली होती.

एमजीएल कोमलजीवन हा एक स्ट्रीट चिल्ड्रेनच्या-शहराच्या घाईगर्दीच्या जीवनात ज्यांचे रुदन आणि वेदना हरवल्या आहेत अशी मुले, कल्याणासाठी तयार करण्यात आलेला पुढाकार आहे. अर्थशून्य जीवन जगणारी, ही मुले सर्व प्रकारच्या शोषणांना बळी पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू, दारिद्र्य, कुटुंबाचे विघटन, लैंगिक शोषण, शारिरीक शोषण, लिंग ओळख, लैंगिक अभिमुखता, वगैरेंसारखी अनेक कारणे या मुलांना त्यांच्या घरांच्या बाहेर काढतात आणि त्यांना दुरुपयोग आणि जुलूम जबरदस्तीला सामोरे जावे लागते. मदतीच्या कोणत्याही सुविधेच्या अभावामुळे ही मुले त्यांच्या जीवनाच्या कठोर वास्तवाशी सामना करण्याच्या धोरणांचा स्वीकार करतात. या धोरणांमध्ये बाह्य कणखरपणा, त्यांची बळी पडण्याची शक्यता लपविण्यासाठी कणखर स्वातंत्र्य आणि इतरांबरोबर गट स्थापन करणे यांचा समावेश असतो. परिस्थिती या मुलांना असे वागायला भाग पडते जसे कुटुंबात राहणारी मुले साधारणपणे वागणार नाहीत.

दारु पिणे, नशिली औषधे वापरणे, पदार्थांचा दुरुपयोग, चोरी (स्वेच्छेने किंवा जबरदस्तीने), भीक मागणे, आक्रमक दृष्टीक्षेप वगैरे सारखी अस्वीकारार्ह धोरणे मुलांना गुंडगिरीकडे ढकलणारी धोरणे म्हणून निश्चीत करता येतील.

बळी पडण्याच्या शक्यता, दुरुपयोग आणि जुळवून घेणारी धोरणे बऱ्याचदा एक नकारात्मक चौकट निर्माण करतात जी सुप्तपणे अधिक आक्रमक आणि हिंसक वर्तनाची जोपसना करतात आणि त्यातून मुलाचा निरागसपणा नाहीसा करून एक गुंड निर्माण करतात.

या प्रकल्पाचे लक्ष्य कमी वरदहस्त लाभलेल्या, विनाछप्पर आणि मूळ नसलेली जी मुले आशाशून्य आणि निराशेचे जीवन जगत आहेत त्यांच्यापर्यंत पोचणे हे आहे. कल्पना अशी आहे की या नाजूक जीवांची जोपासना करायची जेणेकरून ते प्रतिष्ठेचे जीवन जगू शकतील आणि समाजाला सकारात्मक योगदान देऊ शकतील. अशा ६५ मुलांचे आश्रय घरात पुनर्वसन करण्यात केले जात आहे आणि अशा मुलांपर्यंत पोचण्याच्या कार्याखाली आणखी २५०० मुलांपर्यंत पोचलो आहोत. आश्रय घरातील १००% मुलांना औपचारिक शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यांच्या पसंतीच्या कार्यक्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी संगणक साक्षरता, विकास वर्ग, नियमित कार्यशळा, चर्चासत्रे आणि समुपदेशन केले जात आहे.

एमजीएल मुस्कान

‘एमजीएल मुस्कान’ हा समुदाय विकास पुढाकार आहे जो झोपडपट्टी समुदायातील सदस्यांमधील जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून तयार करण्यात आला आहे.

  • ६० पेक्षा अधिक मुलांना आधार वर्ग आणि संगणक वर्गांचा फायदा मिळत आहे.
  • बालवाडी आणि पूरक पोषणापासून १३० मुलांचा फायदा होत आहे.
  • इंग्लीश बोलण्याच्या वर्गांपासून ४० मुलांचा फायदा होत आहे.
  • मोफत आरोग्य शिबीरांपासून ५५० पेक्षा अधिक रुग्णांचा फायदा होत आहे.
  • ५० तरुणांना संगणकीय कौशल्याचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि शिवण वर्गांचा फायदा ३० पेक्षा जास्त महिलांना होत आहे.