कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमग्राहक विभागकस्टमर केअरधोरणे आणि कार्यपद्धती

महत्त्वाची धोरणे

बिलिंगचे धोरण

 • देयके २ महिन्यांतून एकदा तयार केली जातात.
 • ग्राहकाच्या बिलिंग चक्राच्या आधारे एमजीएलद्वारे ४ महिन्यांतून एकदा प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतले जाते.
 • ग्राहकाद्वारे गॅसचा वापर होत नसेल तर, ग्राहकाने एमजीएलला कळवावे ज्याच्या आधारे ग्राहकासाठी किमान आकाराचे देयक तयार केले जाते.
 • एमजीएलद्वारे तय़ार केलेल्या सर्व देयकांचे प्रदान ग्राहकाने देय तारखेला किंवा त्याच्या आधी केले पाहिजे.
 • एकदा ग्राहकाची जोडणी खंडित केली की, जोडणी केवळ एमजीएलच्या स्वेच्छा निर्णयाने वेळोवेळी लागू असलेला जोडणीचा आकार प्रदान केल्यानंतरच केली जाईल.

खंडित करण्याचे धोरण

 • ३ देयकांच्या अ-प्रदानानंतर नेमलेली एजन्सी पुरवठा एकाकी करणारे लॉक लागू करेल.
 • ६ देयकांच्या अ-प्रदानानंतर एमजीएलच्या ऑपरेशन्स अँड मेटेनन्स टीमद्वारे जोडणी संपूर्णपणे खंडित करण्याची कारवाई केली जाईल.
 • लागोपाठ ३ प्रयत्नांती मीटर रिडींग उपलब्ध न झाल्यास आणि ग्राहकाला सूचना दिल्यानंतर.

वसूली आणि पुनर्जोडणी धोरण

 • ग्राहकाला पुनर्जोडणी आकार प्रदान करावा लागेल.
 • एखाद्या ग्राहकाने त्याची पुनर्जोडणी स्थगित ठेवली असेल आणि पूर्वी मात्र रु. १६००/- पदान केले असतील तर, त्याने विभेदक म्हणजे रु. २५००/- प्रदान करावेत.
 • रु. ४४००/- च्या प्रदानानंतर ग्राहक पुनर्जोडणीला पात्र असेल.

एमजीएलद्वारे अनुसरली जाणारी धनादेश न वटण्याबाबतची कार्यपद्धती

 • घरगुती ग्राहकासाठी न वटलेल्या प्रत्येक धनादेशासाठी रु. २००/- आकारले जातात.
 • धनादेश लागोपाठ न वटण्याच्या बाबतीत, ग्राहकांना कलम १३८ खाली नोटीसेस् दिल्या जातात.

ग्राहक विभाग