Mahanagar Gas

होमव्यवसायसीएनजी

फ एक प्रश्न

सीएनजी काय आहे?

सीएनजी म्हणजे काँप्रेसड् नॅचरल गॅस. ते एक वायूरुपी इंधन आहे आणि हायड्रोकार्बन्सचे, मुख्यतः ९५% च्या रेंजमधील मीथेनचे, मिश्रण आहे. त्याच्या कमी घनतेमुळे तो वाहनाच्या ऑन-बोर्ड स्टोरेज क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी २०० बारच्या दाबाला काँप्रेस केला जातो.

सीएनजी सुरक्षित आहे का?

होय, तो सुरक्षित आहे. सीएनजीचे गुणधर्म त्याला एक इंधन म्हणून सुरक्षित करतात. तो हवेपेक्षा हलका आहे आणि त्यामुळे गळती होण्याच्या प्रसंगात तो वातावरणात पटकन विरून जातो. पेट्रोलच्या ३६० अँश सेंटीग्रेडसमक्ष त्याचे ५४० अंश सेंटीग्रेडचे उच्च ऑटो-इग्नीशन तापमान त्यांला अधिकच सुरक्षित इंधन बनविते. सीएनजीची ५% ते १५% मधील कमी ज्वलनशीलतेची रेंजसुद्धा त्याला इतर इंधनांपेक्षा खूपच सुरक्षित बनविते.

कोणत्या प्रकारची वाहने सीएनजीमध्ये रुपांतरित केली जाऊ शकतात?

ठिणगीने प्रज्वलित होणारी सर्व इंजिने सीएनजीमध्ये रुपांतरित केली जाऊ शकतात, ज्यासाठी एक खास तयार केलेले कन्व्हर्शन कीट रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असते. त्या कीटमध्ये कारच्या बूटमध्ये बसविण्यासाठी एक सिलींडर आणि वायूचा प्रवाह इंजिनापर्यंत पोचू देण्यासाठी इतर उपकरणे असतात.

सीएनजी कीट बसविलेली कार, तिच्यातील सीएनजी संपल्यावर पेट्रोलवर चालू शकते का?

होय, सीएनजीमध्ये रुपांतरित केल्यानंतर, पाहिजे असेल तेव्हा सरळ डॅशबोर्डवरील एक स्वीच फ्लिक करून वाहन पेट्रोलवर चालू शकेल.

वाहन सीएनजी-स्नेहीमध्ये रुपांतरित करण्याचा खर्च किती आहे?

वाहनाचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्याचा खर्च तुमच्या वाहनाच्या प्रकारावर आणि सीएनजी कीटवर अवलंबून आहे. सध्या, रुपांतरणाचा खर्च रु.२५,००० ते रु. ५०,००० च्या दरम्यान आहे (अंदाजे).

सीएनजी सिलींडरची आकारमाने आणि वजन किती आहे?

सीएनजी सिलींडर्स एका खास स्टील अलॉयपासून बनविले जातात आणि त्यांची बांधणी जोडविरहित असते. त्यांचा सुटसुटीत आकार त्यांना एखाद्या छोट्या कारमध्ये सहजपणे फीट होऊ देतो. ५० लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या एका रिकाम्या सीएनजी सिलींडरचे वजन ४८ किग्रा (अंदाजे) असते, आणि त्याची लांबी ८३५ मिमी आणि व्यास ३१६ मिमी असतो. ५० लीटर क्षमतेचा सिलींडर सर्वात नियमितपणे वापरला जातो, पण ४५, लीटर, ५५ लीटर, ६० लीटर आणि ६५ लीटर क्षमतेचे सिलींडर्ससुद्धा वापरले जातात.

एखाद्या सिलींडरची क्षमता किती असते, आणि एकदा भरल्यानंतर किती माइलेज मिळते? एखाद्याला सिलींडरमध्ये किती सीएनजी शिल्लक आहे ते कसे कळते?

५० लीटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेला सिलींडर सुमारे ९ किग्रा सीएनजी वाहून नेऊ शकतो. तो १२.५ लीटर पेट्रोलच्या समान आहे आणि ते मध्यम आकाराची १३०० सीसी कार १५०-१६० किमी धावू देईल. डॅशबोर्डवर बसवलेला एक इलेक्ट्रॉनिक फ्युएल गेज, जो रुपांतरण कीटचा भाग असतो, सिलींडरमध्ये शिल्लक असलेला सीएनजी दर्शवेल.

एखाद्या सिलींडरमधील सीएनजीचा दाब किती असतो? दाबाचा विचार करता सिलींडरमध्ये पुन्हा इंधन भरणे सुरक्षित असते का?

सीएनजी सिलींडरस्ची रचना आणि बांधणी उच्च दाब सहन करण्याच्या दृष्टीने केलेली असते. एखाद्या सिलींडरमधील सीएनजीचा कमाल दाब २०० बारपर्यंत असतो. सीएनजी सिलींडर्स सुरक्षितच असतात कारण त्यांची निर्मिती विशिष्ट गरजांनुसार केलेली असते आणि वापरण्यापूर्वी त्यांची इंटरनॅशनल विनिर्दिष्टे आणि प्रमाणनांनुसार चाचणी केली जाते, आणि ते चीफ कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोजिवज् (सीसीओइ) द्वारा यथायोग्य पद्धतीने मंजूर केले जातात. त्याहून अधिक म्हणजे, त्यांना प्रेशर रिलीज डिव्हाइस (पीआरडी) देण्यात आलेले असते ज्यात एक फ्यूजीबल प्लग आणि बर्स्ट डिस्क असते जी अतिशय उच्च दाब आणि तापमानाच्या प्रसंगात फुटते.

सीएनजीमध्ये रुपांतर केल्यानंतर माझा इंधनावरील खर्च कमी होईल का?

होय, वाहनाच्या सरासरी धावण्यावर आधारित इंधनाचे देयक इतर पारंपरिक इंधनांशी तुलना करता मोठ्या प्रमाणात कमी होईल. सीएनजीची किंमत इतर इंधनांपेक्षा कमी आहे आणि ते तुमच्या वाहनाचे माईलेज सुद्धा वाढवते, ज्यामुळे ते सर्वात काटकसरी इंधन ठरते.

माझी कार मी सीएनजीत रुपांतरित केली तर माझी बूट स्पेस गमावेन का?

जेव्हा एखादी कार सीएनजी मध्ये रुपांतरित केली जाते तेव्हा वाहन मालक, सरासरीने, त्यंच्या बूट स्पेसपैकी एक तृतीयांश गमावतात. बूट स्पेस वाहनाच्या आकारावर आणि सिलींडरच्या बनावटीवर सुद्धा अवलंबून असते. तथापि, ज्या लोकांना सीएनजीमध्ये रुपांतरण करण्याची इच्छा आहे ते गमावलेल्या बूट स्पेसची भरपाई करण्यासाठी त्यांच्या वाहनावर कॅरिअर बसवू शकतात.

सीएनजी कीटला सर्विसिंगची गरज असते का?

सीएनजी कीट सुरक्षित आणि साधे आहे. ते अनेक वर्षे विना त्रास सेवा देते. त्याला वारंवार सर्विसिंगची गरज लागत नाही. जसे इतर इंधनांच्या बाबतीत केले जाते तसेच, नित्यनैमिक सर्विंसिग करून घेण्याचा सल्ला दिला जातो. सर्विससाठी अधिकृत व्यक्तीचा सल्ला घ्यावा. गॅस सिलींडर नियम, १९८१ नुसार, प्रेशर टॉलरन्स तपासण्यासाठी सिलींडर प्रत्येक ५ वर्षांनी हायड्रो-स्ट्रेच चाचणीतून जायला हवा.

सीएनजीचा इंजिनावर कोणताही हानिकारक परिणाम होतो का?

सीएनजीच्या वेगळ्याच वैशिष्ट्य़ांमुळे, तो क्रँककेस ऑइल दूषित किंवा सौम्य करत नाही, त्यामुळे इंजिनाला नवीन वाढीव आयुष्य मिळते. सीएनजीमध्ये कोणतेही शीशाचे घटक नसल्यामुळे तो प्लग्सचे लेड फाउलिंग टाळण्यात मदत करतो, त्यामुळे प्लगचे आयुष्य वाढते. जसा सीएनजी गॅसच्या स्वरुपात (इतर इंधनांप्रमाणे फवारा किंवा तुषारांच्या स्वरुपात नाही) इंजिनात प्रवेश करतो, सीएलजीच्या ज्वलनादरम्यान कोणताही कार्बन निर्माण होत माही त्यामुळे झीज आणि घसाऱ्याला वाव कमी होतो.

माझे डिझेल इंजिन आहे - ते सुद्धा रुपांतरित करता येते का?

सध्या, डिझेल वाहनाच्या रुपांतरणाचा खर्च पेट्रोल वाहनाच्या रुपांतरणाच्या खर्चापेक्षा जास्त आहे आणि चालू तंत्रज्ञानाअधीन ते दुहेरी इंधन पद्धतीवर चालू शकत नाही.

मी मुंबई वगळता इतर शहरांमध्ये माझ्या कारमध्ये सीएनजी पुन्हा भरू शकतो का?

सीएनजीवर चालणाऱ्या कार्समध्ये मुंबईच्या बाहेर पुन्हा सीएनजी भरता येतो, कारण भारतातील १४१ वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या सीएनजी उपलब्ध आहे. सीएनजी कॉरीडॉर्स मुंबई-पुणे, मुंबई-भडोच-सुरत-अंकलेश्वर-अहमदाबाद मार्गावर उपलब्ध आहेत.

इतर कोणत्याही इंधनापेक्षा सीएनजी अधिक पर्यावरण स्नेही आहे का?

होय, तो आहे. कारण सीएनजीमध्ये मुख्यतः मीथेन असतो जो अत्यंत साधा हायड्रोकार्बन असतो., तो अधिक स्वच्छ आणि कार्यक्षम इंधन आहे. सीएनजीच्या वापरामुळे कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायोक्साइड अशा कर्करोग, दमा वगैरे रोगांना कारण ठरणाऱ्या घातक वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होते. सीएनजी ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कमी करण्यातही मदत करतो.

सीएनजी भरण्यासाठी वापरले जाणारे सिलींडर्स सुरक्षित आहेत का?

गॅस साठविण्यासाठी वापरले जाणारे सिलींडर्स जागतिक प्रमाणनांनुसार अत्यंत उच्च सुरक्षा घटकांसह तयार केलेले असतात. या सिलींडर्सची वैधानिक प्राधीकरणांद्वारे चाचणी केली जाते आणि ते वापरण्यासाठी प्रमाणित केले जातात आणि प्रत्येक सिलींडर वापराची समाप्तीची तारीख निश्चीत केली जाते, ज्यानंतर त्यांची सुरक्षित वापरासाठी पुन्हा चाचणी करायची असते. हे सिलींडर्स अपघाताच्या प्रसंगात धक्का सहन करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. तथापि, गॅस सिलींडर नियम, १९८१ नुसार, सिलींडर दर ५ वर्षांनी दाब सहनशीलता तपासण्यासाठी हायड्रो-स्ट्रेच चाचणीतून जावा लागतो.

डिझेलवर चालणारी कोणती व्यावसायिक वाहने सीएनजीमध्ये रुपांतरित करता येतात?

जवळ जवळ सर्व लोकप्रिय एलसीव्हीज् आणि एचसीव्ही मॉडेल्सची १ टन ते १६ टनच्या पेलोड रेंजमधील सीएनजी कीटस् बीएस-।। मॉडेल्ससाठी उलब्ध आहेत आणि बीएस-।।। कीटस् नोव्हेंबर २०१३ पर्यंत अपेक्षित आहेत. या वाहनांच्या मॉडेल्समध्ये समाविष्ट आहेतः टाटा ४०७, ७०९, ९०९, ११०९, १६१३, महिन्द्रा पिक अप, लोड किंग, डीआय ३२००, आयशर १०.५, स्वराज मझदा सुप्रीम, सरताज, टाटा १५१२ बस, ९०९ बस, एएल १५१६ बस, टीआय ३५०० मिनी बस वगैरे. टाटा एससाठी सीएनजी कीट सुद्धा आय-सीएटी प्रक्रियेधीन आहे.

डिझेल वाहन सीएनजीमध्ये रुपांतरित करण्याचा खर्च किती आहे?

एखादे वाहन सीएनजीमध्ये रुपांतरित करण्याचा खर्च तुमच्या वाहनाचा आणि सीएनजी कीटचा प्रकार आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या सिलींडर्सच्या संख्येवर अवलंबून आहे. सध्या, रुपांतरणाचा खर्च रु. १,२५,००० आणि ३,५०,००० च्या दरम्यान आहे (अंदाजे). टाटा ४०७, ७०९, महिन्द्रा डीआय ३२०० - १.५ लाख, टाटा ९०९, ११०९ आणि एएल १६१३ इतर एचसीव्हीज्- ३ लाख, मिनी बसेस-बसेस (टाटा आणि असोक लेलँड) - २ लाख ते ३.५ लाख.

व्यावसायिक वाहनांसाठी फॅक्टरी फिटेड सीएनजी प्रकार उपलब्ध आहेत का?

होय, टाटा, महिन्द्रा, आयशर, एसएमएल वगैरेंसारख्या सर्व प्रमुख वाहन निर्मात्यांचे त्यांच्या टाटा एस, मॅजिक, क्झेनॉन, ४०७, ७०९, ९०९, ११०९, १५१२ बस, १६१६ बस, ९०९ बस सीएनजी एचवाय बस महिन्द्रा पिक अप, मॅक्झीमो, लोड किंग, डीआय२००,आयशर १०.५, स्कायलाइन बस, एसएमएल - टीआय ३५०० बस, सुप्रीम, सरताज, फोर्स मोटर ट्रम्प२०, ट्रॅव्हलर मिनी बस, अशोक लेलँड दोस्त, बल १६१३ वगैरेंसारख्या लोकप्रिय मॉडेल्सचे सीएनजी प्रकार उपलब्ध आहेत.

सीएनजी कीटला सर्विंसिंगची गरज असते का?

सीएनजी कीट सुरक्षित आणि साधे आहे. ते अनेक वर्षे त्रासमुक्त काम करते. त्याला वारंवार सर्विसिंगची गरज लागत नाही. जसे इतर इंधनांच्या बाबतीत असते अगदी तसेच, नित्यनैमिक सर्विसिंगचा सल्ला दिला जातो. सर्विससाठी अधिकृत व्यक्तीचा सल्ला घ्यावा. गॅस सिलींडर नियम, १९८१ नुसार, सिलींडर दर ३ वर्षांनी दाब सहनशीलता तपासण्यासाठी हायड्रो-स्ट्रेच चाचणीतून जावा लागतो.

सीएनजी कीट एखाद्या व्यावसायिक वाहनात डिझेल इंजिनाच्या बरोबर राहू शकते?

नाही. सीएनजीला स्पार्क इग्निशन (एसआय) आवश्यक असते तर डिझेल इंजिनमध्ये काँप्रेसड् इग्निशन अशते त्यामुळे डिझेल वाहनांच्या बाबतीत दुहेरी इंधनाचा पर्याय उपलब्ध नाही. तथापि, सीएनजीवर चालणाऱ्या व्यावसायिक वाहनांमध्ये बसविलेले अनेक सिलींडर्स सीएनजी संपूर्णपणे संपून जाण्यापूर्वी पुन्हा भरण्यासाठी भरपूर वेळ देतात.

एखाद्या वाहनाच्या पेलोडवरील सीएनजी कीटचा प्रभाव.

फॅक्टरी फिटेड [फिटेड]सीएनजी वाहनांचा पेलोड डिझेल वाहनांच्या इतकाच असतो, तथापि, रिट्रो फिटमेंटच्या बाबतीत वाहनाचा पेलोड केवळ सिलींडरच्या वजनाच्या प्रमाणानुसार कमी होतो.

मुंबईत व्यावसायिक वाहनांच्या डिझेल आणि सीएनजी प्रकारांचे प्रचालनीय आयुष्य किती आहे?

फॅक्टरी फिटेड सीएनजी वाहने मुंबईत नोंदणीच्या तारखेपासून १६ वर्षांसाठी धावू शकतात. वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयाने सुद्धा स्पष्टपणे म्हटले आहे की ८ वर्षांचे आय़ुष्य असलेले मुंबई शहरात धावणारे कोणतेही डिझेल वाहन, जर सीएनजी मध्ये रुपांतरित केले तर ते नोंदणीच्या मूळ तारखेपासून १६ वर्षांपर्यंत धावू शकेल. उदाहरणार्थ, एकादे डिझेला वाहन १ वर्षानंतर सीएनजीमध्ये रुपांतरित केले तर त्याला सीएनजीवर १५ वर्षांचे आयुष्य असेल, आणि २ ऱ्या वर्षात रुपांतरित केले तर वाहनाचे सीएनजीवरील आयुष्य १४ वर्षे असे आणि असेच पुढे. त्यामुळे, सीएनजीमध्ये लवकर रुपांतरण केल्याने केवळ वाहनाचे आयुष्यच वाढणार नाही तर इंधनाच्या खर्चातही बचत होईल.  

डिझेल प्रकारांशी तुलना करता सीएनजीवर चालणारी व्यावसायिक वाहने काटकसरी आहेत का?

सीएनजी वाहनांची सुरवातीची किंमत डिझेलपेक्षा जास्त असली तरी, दीर्घकाळाने सीएनजीवर चालणारी वाहने एकंदरीत प्रचालनीय खर्चात कपात करण्यात मदत करतात. सीएनजीवर चालणारी व्यावसायिक वाहने डिझेल वाहनांशी तुलना करता सरासरी प्रचालनीय खर्चाच्या दृष्टीने ३४% काटकसरी आहेत. दर दिवशी सरासरी ५० किमी धावणाऱी एलसीव्हीज् २.५ वर्षांत कीटचा खर्च सहजपणे वसूल करू शकतात.

व्यावसायिक वाहनांच्या सीएनजी रिट्रोफिटिंग कीटस् साठी कोणताही आर्थिक पर्याय सुद्धा उपलब्ध आहे का?

होय. चोलामंडलम आणि श्रीराम फायनान्स सारख्या काही आघाडीच्या ऑटोमोबाइल रिफायनान्सिंग कंपन्यांकडे व्यावसायिक वाहनांसाठी सीएनजी कीटसाटी वित्त पुरवठा करण्याची ही सुविधा आहे. सीएनजी वाहनाच्या मोफत प्रात्यक्षिकासाठी किंवा आणखी प्रश्नांसाठी लिह: mglecng@mahanagargas.com 

व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचे रिट्रो फिटमेंट कोण करू शकतो?

व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजी कीटस् च्या रिट्रो फिटमेंटसाठी एआरएआय आणि आरटीओने अधिकार दिलेले ६ वर्कशॉप्स मुंबईत आहेतः मे. श्रीमंकर ऑटो गॅस (शिवडी), मे. ग्रीन ग्लोब फ्युएल सोल्यूशन्स (मुलुंड), मे. चुन्नीलाल (भांडुप), मे. मार्स इग्नीशन (मीरा रोड), मे. लोटस (पवई) आणि श्री. धिंग्रा तुर्भे (नवी मुंबई). अधिक तपशीलासाठी : www.mahanagargas.com. 

व्यवसाय