Mahanagar Gas

होमव्यवसायव्यवसाय-घरगुती पीएनज

फ एक प्रश्न

पाइपड् नॅचरल गॅस (पीएनजी) काय आहे?

पीएनजी [पीएनजी]हा मुख्यत्वे मीथेन - सीएच४ आहे, ज्यात थोडीशी टक्केवारी इतर उच्चतम हायड्रोकार्बन्सची आहे. कार्बनचे हायड्रोजनशी गुणोत्तर मीथेनमध्ये कमीत कमी आहे आणि त्यामुळे तो जवळ जवळ संपूर्ण जळतो आणि त्यामुळे तो पर्यावरण स्नेही ठरतो. तो तेल/गॅसच्या विहीरींमधून प्रापण केला जातो आणि पाइपलइन्सच्या जाळ्यातून वाहून आणला जातो.

पीएनजी जोडणी मिळवण्याचा खर्च किती आहे?

सध्या आम्ही एका घरगुती गॅस जोडणीसाठी रु. ६५००/- आकारत आहोत, ज्यात समाविष्ट आहेतः

 • अर्जाप्रती ना-परतावायोग्य आकार रु. ७५०/-
 • जोडणीसाठी बिनव्याजी परतावायोग्य सुरक्षा अनामत रु. ५०००/- आणि
 • गॅसच्या वापरासाठी बिनव्याजी परतावायोग्य सुरक्षा अनामत रु. ७५०/-

पीएनजी जोडणीसाठी सुरक्षा अनामत हे काय आहे?

“सुरक्षा अनामत” म्हणजे बिनव्याजी परतावायोग्य रक्कम जी ग्राहकाकडून जोडणी देण्याच्या वेळेस ग्राहकाच्या जागेत स्थापित केलेली उपकरणे सुरक्षित राखण्याप्रती घेतली जाते.

गॅसच्या वापरासाठी सुरक्षा अनामत हे काय आहे?

लवचिक गॅस वापर सुरक्षा ठेव

 • प्रत्येक ग्राहकाने अर्ज प्रपत्र सुपूर्द करतेवेळी किंवा वर्षभरात अशी मागणी एमजीएलने केल्यावर रु ७५०/- सुरक्षा ठेव म्हणून जमा करणे आवश्यक आहे.
 • प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस, एमजीएल प्रत्येक ग्राहकाच्या गॅस वापराचे विश्‍लेषण करेल आणि बारा महिन्यांच्या सहा बिलांमधील सरासरी वापर जर रु ७५०/- हून जास्त असेल, व त्यावर आधारित सरासरी गॅस विक्री जर उपलब्ध सुरक्षा ठेवीहून जास्त असेल, तर आम्ही अशा ग्राहकांकडून दरवर्षीच्या मे आणि जूनच्या बिलांमध्ये एकवेळच्या भेददर्शक शुल्काची मागणी करू.
 • भेददर्शक सुरक्षा ठेव रु १००/- च्या पटींमध्ये आकारली जाईल.
 • सुधारित सुरक्षा ठेव (अतिरिक्त) न भरल्यास ती कसूर मानण्यात येईल आणि त्यामुळे जोडणी खंडित होण्यास पात्र ठरेल.
 • जेव्हा जोडणी खंडित होईल, तेव्हा पुन्हा जोडणी सुरु करण्यापूर्वी जोडणी खंडित करण्याचे व पुन्हा सुरु करण्याचे शुल्क ग्राहकाला आकारले जाईल.

जोडणी आणि गॅस देयकांसाठीचे प्रदान कोणाच्या नावे करायचे आहे?

डीडी/धनादेश केवळ ''महानगर गॅस लिमिटेड'' च्या नावे काढला पाहिजे. रोख प्रदान करू नये. प्रदान पीएनजी जोडणीप्रती केले असेल तर, कृपया डीडी/धनादेशाच्या मागील बाजूला नाव आणि संपर्क क्रमांक लिहा. प्रदान गॅस देयकाप्रती केले असेल तर, कृपया डीडी/धनादेशाच्या मागील बाजूला नाव, संपर्क क्रमांक, बिझनेस पार्टनर (बीपी) क्रमांक आणि काँट्रॅक्ट अकाउंट(सीए) क्रमांक लिहा.

गॅस गीझर बसविण्याची पद्धत काय आहे कारण मला माझ्या सदनिकेत गॅस गीझर बसवायचा आहे?

विद्यमान पीएनजी उपभोक्त्यांनी गॅस गीझरसाठी विनंती करण्यासाठी (कस्टमर केअर) लॉग इन करणे आवश्यक आहे. नवीन ग्राहकांनी त्यांची गॅस गीझरची गरज नोंदणीच्या वेळी विनिर्दिष्टीत करणे आवश्यक आहे. अनधिकृत व्यक्तींमार्फत गॅस गीझर न बसविण्याची नेहमीच खात्री करा. ग्राहकांनी गॅस गीझर बसविण्याच्या गरजेसाठी केवळ कस्टमर केअरला कॉल करावा. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव गीझर स्नानगृहात बसविला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

आम्ही जागा सोडत आहोत आणि सदनिका विकली आहे त्यामुळे गॅस जोडणी कायमची परत करण्याची पद्धत काय आहे?

तुमची कायमची डिसकनेक्शनची विनंती संपर्क क्रमांकासह आमच्या कस्टमर केअरला लेखी पाठवा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्या जागेला भेट देईल आणि लाइन डिसकनेक्ट करेल. डिसकनेक्शनच्या वेळी तुमची आधीची सर्व देणी दिलेली असतील याची खात्री करा. (कायमचे डिसकनेक्शन करण्याचे आकार अस्तित्वात असलेल टॅरीफ कार्ड प्रमाणे लागू असतील)

पीएनजीचा पुरवठा नियमित असतो का?

होय, पुरवठा अगदी नियमित सतो. पाइपलाइन वितरण जाळे पॉझिटिव गॅस प्रेशरवर आधारित असते जे अनावश्यकतेसाठी लूप सुद्धा केलेले असते. अशा प्रकारे सामान्य परिस्थितीत, सातत्यपूर्ण दाबाने विनाव्यत्यय पुरवठ्याची हमी दिली जाते.

पीएनजी जोडणी मिळाल्यानंतर मला अनुदानित एलपीजी जोडणी परत करावी लागेल का?

होय, पोट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (एमओपीएनजी) दिनांकित २३.०९.२००९ आणि १६.१२.२०१३ च्या अधिसूचनांनुसार तुम्हाला अनुदानित एलपीजी जोडणी परत करावी लागेल. तुम्ही पीएनजी पुरवठा सुरू झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत अनुदानित एलपीजी जोडणी परत केली नाहीत तर, एमजीएल पीएनजीचा पुरवठा बंद करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. तथापि, एलपीजी नियंत्रण आदेश पत्र दिनांकित ९ जानेवारी २०१४ नुसार तुम्ही एक एलपीजी जोडणी ठेवून घेऊ शकता आणि सरकारी तेल कंपन्या विना-अनुदान दराने रिफील पुरवतील.

आपकी बिलिंग प्रक्रिया क्या है?

आपका गैस खपत का बिल हर दूसरे महीने तैयार होता है, एक मूल्यांकन बिल और एक वास्तविक बिल के साथ। मूल्यांकन बिलिंग पिछले छह महीनों के दौरान आपके उपभोग के औसत पर बनता है, वास्तविक बिलिंग वास्तविक मीटर रीडिंग पर बनता है जो हमारे मीटर रीडर द्वारा ली जाती है जो चार महीने में एक बार आपके घर का दौरा करता है। अधिक जानकारी के लिए कृपया हमारे बिलिंग सेक्शन में जाएँ।

मी माझ्या तक्रारी कशा कळवू?

आमच्या मूल्यवान ग्राहकांना मदत करण्यात आणि पीएनजी पुरवठा आणि सेवांच्या बाबतीतील कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांना संबोधित करण्यात आम्हाला आनंदच होईल. अधिक माहितीसाठी कृपया आमच्या कस्टमर केअर सेक्शनला भेट द्या.

बाजारात उपलब्ध असणारी नैसर्गिक वायू उपकरणे कोणती आहेत?

सध्या, गॅस गीझर्स, एअर कंडिशनर्स आणि जनरेटर्स अशी विविध गॅस आधारित उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. तथापि, गॅस गीझरचा वापर आमच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने घरगुती विभागात केला जात आहे. एअर कंडिशनर्स आणि जनरेटर्स सारखी इतर उपकरणे बहुतांशी व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये वापरली जात आहेत.

नैसर्गिक गॅस गीझर कसे काम करतो?

गॅस आधारित गीझर्स नैसर्गिक वायूच्या ज्वलनातील, ज्वाळेतून थेट पाण्याकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या, उर्जेचा वापर करून काम करतो. या यंत्रणा अतुल्यपणे पाणी गरम करण्यात कार्यक्षम आहेत. घरगुती ग्राहकांसाठी काटकसरीचा आणि विश्वासार्ह उपाय म्हणून स्वयंपाकगृहात आणि स्नानगृहात गरम पाणी पुरविणे ही एमजीएलची लक्ष्ये आहे. अधिक माहितीसाठी कृपया आमच कस्टमर केअर सेक्शनला भेट द्या.

नैसर्गिक वायू चलित जनरेटर्सचा हेतू काय आहे?

निवासी इमारतींसाठी गॅस जनरेटर्स- ग्रीड पॉवरच्या अनुपलब्धतेच्या वेळी निवासी सोसायट्यांना बॅक अप पॉवर उपाय पुरविणे हा उद्देश आहे. सध्या, बॅक अप पॉवरच्या गरजांसाठी डिझेल जनरेटर्स वापरले जातात ज्यांची जागा गॅस जनरेटर्स घेऊ शकतील.

नैसर्गिकवायू आधारित एअर कंडिशनिंग काय आहे?

नैसर्गिक वायू आधारित एअर कंडिशनिंगमध्ये नवीन काहीच नाही, वस्तुतः, १९४०' आणि ५०' मध्ये त्याने बहुतांश एअर कंडिशनिंगच्या गरजा पुरविल्या. तथापि, तंत्रज्ञानातील नवीन प्रगती आणि कार्यक्षमतेमुळे, नैसर्गिक वायू आधारित एअर कंडिशनिंग लोकप्रियतेच्या पुनः प्रत्ययाचा अनुभव घेत आहे. आधुनिक नैसर्गिक वायू आधारित एअर कंडिशनर्स अधिक कार्यक्षम, दीर्घकाळ टिकणारे आणि देखभाल कमी लागणारे आहेत.

करावे आणि करू नये

करावे

 • खिडक्या आणि दारे उघडा.
 • उपकरणाचा वाल्व बंद करा (रबर ट्यूबच्या अगदी सुरवातीला असणारी पिवळी चावी).
 • मीटर कंट्रोल चावी बंद करा (मीटरच्या जवळची चावी).
 • ताबडतोब २४ ताशी आणीबाणी परिस्थितीतील क्रमांक 18002669944 (टोल फ्री) / (022)-68759400 / (022)-24012400 वर कॉल करा

करू नये

 • बर्नर किंवा इतर कोणत्याही वस्तू प्रज्वलित करू नये.
 • घरातील विद्युत स्वीचेस्/उपकरणे चालू/बंद करू नयेत.
 • घराच्या त मोबाइल फोनचा वापर करू नये
 • गॅसची उपकरणे किंवा पाइपलाइन्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये.
 • अनधिकृत व्यक्तीकडून गॅसलाइन्स/उपकरणे दुरुस्त करून घेऊ नयेत.

गॅस येणे बंद होण्याच्या बाबतीत

करावे

 • कोणीतरी राइजर आयसोलेशन वाल्व (तळ मजल्यावर असलेला) बंद केला आहे का ते तपासा.
 • उपकरणाचा वाल्व बंद करा (रबर ट्यूबच्या अगदी सुरवातीला असणारी पिवळी चावी).
 • मीटर कंट्रोल चावी बंद करा (मीटरच्या जवळची चावी).
 • ताबडतोब २४ ताशी आणीबाणी परिस्थितीतील क्रमांक 18002669944 (टोल फ्री) / (022)-68759400 / (022)-24012400 वर कॉल करा.

करू नये

 
 • गॅस उपकरणे किंवा पाइपलाइन स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका.
 • रायजर आयसोलेशन वाल्व उघडू नका.

आगीच्या प्रसंगात

कराव

 • गॅसचा नळ बंद करा.
 • कंट्रोल वाल्व बंद करा.
 • रायजर आयसोलेशन वाल्व बंद करा.
 • सर्व माणसांना सुरक्षित जागी पाठवा.
 • ताबडतोब २४ ताशी आणीबाणी परिस्थितीतील क्रमांक 18002669944 (टोल फ्री) / (022)-68759400 / (022)-24012400 वर कॉल करा.

करू नये

 
 • गॅस उपकरणे किंवा पाइपलाइन स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका.
 • रायजर आयसोलेशन वाल्व उघडू नका.

गॅसच्या वापरासाठी सावधगिरी

रोजच्या कामकाजांसाठी सावधगिरी:

 

घरगुती पीएनजी ग्राहक

 • स्वयंपाकाची उपकरणे प्रज्वलित करण्यापूर्वी, गॅसचा वास येत नसल्याची खात्री करा.
 • रबरी पाइप चांगल्या स्थितीत आहे आणि तो स्वयंपाकाच्या उपकरणाला आणि उपकरणाच्या वाल्वला योग्य प्रकारे बसविलेला आहे याची खात्री करा.
 • उपकरणाचा वाल्व आधी उघडा, नंतर स्वयंपाकाच्या उपकरणाची चावी उघडा आणि ताबडतोब बर्नर प्रज्वलित करा.
 • गरम भांडी किंवा गरम वस्तू गॅस स्टोवच्या पाइपला स्पर्श करत नाहीत याची खात्री करा.
 • स्वयंपाकानंतर उपकरणाचा वाल्व बंद करण्याची सवय लावून घ्या.
 • केवळ पीएनजीवर चालण्यासाठी रुपांतरित केलेला स्टोव वापरा.
 • तसेच संपूर्ण दिवसाचा स्वयंपाक एकदा झाला की रात्री स्वयंपाकघराच्या आतील मेन कंट्रोल वाल्व/मीटर कंट्रोल वाल्व बंद करण्याची सुद्धा सवय लावून घ्या.

घरगुती पीएनजी इन्सटॉलेशन्ससाठी सुरक्षा उपाय

   
 • गॅसच्या पाइपलाइनवर काहीही बांधलेले किंवा टांगलेले नाही याची खात्री करा.
 • गॅसच्या पाइपलाइनला, आसपास केल्या जाणाऱ्या कोणत्याही कामामुळे धक्का बसणार नाही किंवा ती खराब होणार नाही याची खात्री करा.
 • तुम्ही जीआय पाइपलाइन, मीटर, रेग्युलेटर, किंवा उपकरणाचा वाल्व भिंतीत/फर्निचरमधये बंदिस्त करणार नाही याची खात्री करा.
 • तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एक मीटरपर्यंतच्या लांबीचा रबरी पाइप वापरणे योग्य ठरेल.
 • गॅस लाइनच्या जवळ विद्युत/दूरध्वनी वायर्स/केबल्स बसवू नका, तसेच त्या गॅस इन्स्टॉलेशन्सना बांधू सुद्धा नका.
 • तुमच्या जागेत भूमीगत टाकलेल्या पाइपलाइनच्या वरील जमीन खणू नका.
 • तुमच्या जागेला होणारा गॅसचा पुरवठा सुरळित ठेवण्याच्या दृष्टीने तुमच्या जागेत किंवा आजूबाजूला किंवा रस्त्यावर कोणतेही खोदाई चालल्याचे तुमच्या निदर्शनास आल्यास एमजीएलला टोल फ्री क्र. 18002669944 वर कॉल करा.
 • एमजीएलच्या पाइपलाइन्स सुरक्षित ठेवण्यासाठी इमारतीच्या कोणत्याही स्तापत्य/दुरुस्तीच्या कामाची एमजीएलला टोल फ्री क्र. 18002669944 वर माहिती द्या.
 • पाण्याच्या/गटाराच्या वाहिन्या भूमिगत/भूमीवरील गॅस इन्स्टॉलेशन्सच्या खूप जवळून जात नाहीत आणि त्यातून गळती होत नाही याची खात्री करा.
 • गॅस गीझर जोडणीसाठी योग्य वॉटर लाइन प्लंबिंगची खात्री करा.
 • घरातील बदल किंवा नूतनीकरणामुळे गॅसच्या इन्स्टॉलेशन्सवर परिणाम होत असेल तर मार्गदर्शनासाठी एमजीएलशी संपर्क साधा.
 • गॅस इन्स्टॉलेशन्समध्ये कोणतीही सुधारणा/विस्तार/बदलणे आवश्यक असल्यास त्यासाठी कृपया एमजीएलशी संपर्क साधा.
 • घरगुती जोडणीचा वापर व्यावसायिक हेतूंसाठी करू नका. अशा जोडण्या उघडकीला आल्या तर, जोडणीचा गॅस पुरवठा खंडित करण्यात येईल आणि कंपनीकडून उचित कारवाई करण्यात येईल.
 • अनधिकृत व्यक्तीकडून गॅस लाइनमधील कोणतीही सुधारणा करून घेऊ नका.

माझ्या पत्त्यात दुरुस्ती आवश्यक असेल तर काय़?

 • विंगचे नाव, सोसायटीचे नाव/इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव, जवळची खूण, शहर, क्षेत्र/वस्ती, पीन कोड वगैरेंमधील सुधारणेसाठी, कृपया सोसायटीच्या लेटरहेडवर सेक्रेटरीचे नाव, बिझनेस पार्टनर क्र. आणि संपर्क क्र. सह योग्य पत्ता अग्रेषित करा. कृपया नोंद घ्या की असे बदल करण्यासाठी मोबाइल देयकांसारखे इतर कागदोपत्री पुरावे स्वीकारले जात नाहीत.
 • नावाची शब्दरचना/मजला क्र./सदनिका क्र. यातील बदलांसाठी कृपया विद्युत देयक, निवासी सोसायटीने दिलेली मेंटेनन्स पावती, नोंदणीकृत करार यांची स्व-साक्षांकित प्रत पाठवा.
 •  
 • कृपया नोंद घ्या की मोबाइल देयक किंवा पॅन कार्ड असे कागदोपत्री पुरावे असे बदल करण्यासाठी स्वीकारले जात नाहीत.

(support@mahanagargas.com ला इ-मेल करा किंवा पे अँड अकाउंटस् ऑफिस, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, मुंबई - ४००० ५१ यांच्याकडे पाठवा)

ऑनलाइन नोंदणी कोण करू शकतो?

इमारतीतील किमान एक रहिवासी पीएनजी जोडणी वापरत असेल तर, अर्जदार ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज करू शकतो.

इमारतीतील कोणत्याही रहिवाशाकडे पीएनजी जोडणी नसेल तर काय?

कृपया पीएनजी जोडणी घेण्यास इच्छुक असलेल्या लोकांची संख्या, सेक्रेटरीचे नाव, मोबाइल क्रमांक आणि सही साहित सोसायटीच्या लेटरहेडवर इमेल करा किंवा पत्र पाठवा. ( support@mahanagargas.com ला इ-मेल करा किंवा पे अँड अकाउंटस् ऑफिस, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, मुंबई - ४००० ५१ यांच्याकडे पाठवा)

ऑनलाइन नोंदणीसाठीची कार्यपद्धती काय आहे?

अर्जदार पुढील दुव्यावर क्लिक करून ऑनलाइन प्रपत्र भरू शकत

ग्राहक नोंदणीसाठी ऑनलाइन प्रदान करू इच्छित असेल तर, तो प्रदानाच्या विविध पद्धतींचा वापर करू शकेल. ग्राहकाला धनादेश/डीडी मार्फत प्रदान करायची इच्छा असेल तर विद्युत देयक/सोसायटी मेंटेनन्स देयक/भाडे पावती/करार अशा आवश्यक कागदपत्रांच्या बरोबर प्रपत्राची प्रिंट आउट घ्या आणि ती कस्टमर केअर डिपार्टमेंट, पे अँड अकाउंडस् ऑफिस, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, मुंबई ४०००५१. यांच्याकडे पाठवा.

कृपया नोंद घ्या की अर्ज सदनिकेच्या विद्यमान मालकाच्या नावे असणे आवश्यक आहे.

व्यवसाय