निसर्गाशी सुसंवाद राखणे हे एमजीएलच्या दूरदृष्टीला अपकेंद्री आहे. त्यामुळे एमजीएल पर्यवरणाच्या समस्यांना सर्वात जास्त प्राधान्य देते.
आपल्या निसर्ग यंत्रणेत प्राणी आणि पक्षी महत्त्वाचा भाग आहेत. आपल्याप्रमाणेच त्यांनाही, जागा, अन्न आणि स्वच्छ पाणी लागते. एमजीएलने एका स्वयंसेवी प्राणी कल्याण संघटनेला पाठबळ पुरवले आहे. हस्तक्षेपाचे लक्ष्य केवळ बेघरपणामुळेच नाही तर उपासमार आणि क्रौर्याचा त्रास होणारे भटके प्राणी आहेत. रस्त्यावरच्या अपघातांची कारणे, रोग पसरविणे, चावणे, कोलाहल माजवणे, घाण करणे, भांडणे वगैरे त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा समस्या मानले जाते.
प्रकल्पाच्या घटकांमध्ये समाविष्ट आहेतः
- निर्बीजीकरणाच्या मार्गाने भटक्या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणेः- १८०० भटक्या प्राण्यांचे निर्बीजीकरण करण्याचे लक्ष्य आहे.
- रोगी असलेल्यांवर उपचार करणेः- रोगी प्राण्यांवर उपचार करणे आणि
- पालनपोषण दत्तक
हे करण्यासाठी एमजीएलपाशी विस्तारित सुविधा आहेत:
- निर्बीजीकरण आणि उपचारांसाठी अद्यतन तंत्रज्ञान असलेली पशुवैदयकीय आयसीसीयु स्थापित करणे,
- निर्बीजीकरण आणि उपचारांसाठी शस्त्रक्रियापूर्व आणि पश्चात वॉर्डस् आणि पिंजरे बसविणे,
- संपूर्ण शस्त्रक्रिया हरित उर्जेत रुपांतरित करण्यासाठी सौर उर्जा संयंत्र,
- त्वरित प्रतिसादासाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका.