श्री. भुवन चंद्र त्रिपाठी, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, गेल (इंडिया) लिमिटेड यांची नेमणूक बोर्डवरील डायरेक्टर म्हणून करण्यात आलेली आहे व त्यांची दि. 29 नोव्हेंबर, 2018 पासून महानगर गॅस लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
श्री. त्रिपाठी 1 ऑगस्ट, 2009 पासून चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर आहेत व ते जुलै 2007 पासून कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली व अथक परिश्रमांनी जीएआयएलने आंतरराष्ट्रीय स्तरावरील एलएनजी पोर्टफोलिओतील कंपन्यांमधील पहिल्या 10 कंपन्यांमध्ये स्थान मिळवलेले आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील ‘महारत्न’ उपक्रम होण्याचाही मान मिळवलेला आहे.
जीएआयएलने गेल्या दशकात गॅस ट्रान्समीशनची क्षमता दुप्पट करून, पेट्रोकेमिकल्स मार्केटेबल पोर्टफोलिओ तिपटीने वाढवून नॅचरल गॅस मिडस्ट्रीम व डाऊनस्ट्रीम चेन्समधील आपला कोअर बिझिनेस अधिक सक्षम केलेला आहे आणि 8.0 एमटीपीए लाँग टर्म एलएनजी विविध ठिकाणी आणि अनेक क्षेत्रांमध्ये मिळवून भारताच्या उर्जा सुरक्षिततेला सहाय्य करण्यासाठी अनेक प्रकारच्या नवीन संधींचाही लाभ घेतलेला आहे. एलएनजी धोरणाबरोबरच, गेल ने वादग्रस्त दाभोळ रेगास टर्मिनल ओनर्स इंजिनिअर म्हणून सुरू केलेले आहे आणि एलएनजी शिप्स चार्टरिंगच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे, ज्यामुळे एलएनजी ट्रेडिंग चक्रात त्यांना संर्वांगीण स्वरूपाचे कार्य करता येणे शक्य होणार आहे. जीएआयएलला आंतरराष्ट्रीय स्तरावरील एलएनजी व एनजी बाजारपेठांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, श्री. त्रिपाठी यांना 14 वे डब्ल्यूसी समिट, पॅरीस येथे ‘बेस्ट एलएनजी एक्झिक्युटिव्ह’ चा पुरस्कार देण्यात आला.
श्री. भुवन चंद्र त्रिपाठी हे एमएनएनआयटी, अलाहाबाद, येथून मेकॅनिकल इंजिनिअर झालेले असून त्यांनी मल्टि-बिलियन डॉलर इन्फ्रास्टक्चर्सच्या प्रकल्पांचे नेतृत्व केलेले आहे आणि सरकारला व स्टेकहोल्डर्सना सतत सहाय्य केलेले आहे, ज्यामागे त्यांच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि उर्जा धोरणे व नैसर्गिक वायू क्षेत्रासाठी नियमने ठरवण्यात एकमताने निर्णय घेण्याच्या पद्धतीचा मोठाच वाटा आहे.
श्री. त्रिविक्रम अरूण रामनाथन, बीजीएपीएच नॉमिनी, यांची दि. 10 मे 2019 पासून महानगर गॅस लिमिटेडच्या बोर्डवर नॉन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे.
श्री. त्रिविक्रम हे जनरल मॅनेजमेंट शेल एक्झिक्युटिव्ह असून त्यांना टेक्नो कमर्शिअल पार्श्वभूमी लाभलेली आहे तसेच विविध कमर्शिअल/ डीलमेकिंग, ऑपरेशनल/ सुरक्षा, समस्या निराकरण, व्हेंचर डेव्हलपमेंट व नियामक/मार्गदर्शक भूमिकांमधील कामांचा अनुभव आहे, ज्यात इंटिग्रेटेड गॅस व पॉवर, एलएनजी, अपस्ट्रीम एक्स्प्लोरेशन व मध्यपूर्वेकडील देश, यूरोप / यूके, अतिपूर्वेकडील तसेच दक्षिण आशियातील देशांमधील कामांचा समावेश आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या सध्याच्या कामात ते शेलच्या भारतातील अपस्ट्रीम व्यवसायात जनरल मॅनेजर या पदावर तसेच बीजी एक्स्प्लोरेशन अँड प्रॉडक्शन इंडिया लिमिटेड (रॉयल डच शेलची 100% सबसिडियरी) येथे मॅनेजिंग डायरेक्टर पदावर काम करीत आहेत, जी एक ऑइल व गॅस निर्मिती सबसिडिअरी असून शेलच्या इंटिग्रेटेड गॅस बिझिनेस पोर्टफोलिओतील 600 पेक्षाही जास्त अनुभवी व्यावसायिक तेथे कार्यरत आहेत.
त्यांच्या नेहमीच्या कार्यक्षेत्राखेरीज, श्री. त्रिविक्रम हे युनिवर्सिटी ऑफ केंब्रिज येथील इन्स्टिट्यूट फॉर मॅन्युफॅक्चरिंग येथे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे व्हिजिटिंग कॉर्पोरेट स्पीकर आहेत. ते लंडन येथील स्टार्टअप व्यावसायिकांसाठी एनर्जी व सस्टेनॅबिलिटी क्षेत्रासाठी मार्गदर्शकाचे काम करीत आहेत आणि ते हार्वर्ड बिझिनेस स्कूल एंजल्स असोसिएशन ऑफ लंडनचे सदस्य आहेत. या खेरीज त्यांना क्रीडाक्षेत्रात विशेष रस आहे (टेनिस, पोहणे व गोल्फ), तसेच त्यांना पियोनोवादन करायलाही आवडते, खगोलशास्त्र व पशुधन स्वास्थ या क्षेत्रांचीही त्यांना आवड आहे आणि ते युनिवर्सिटी ऑफ केंब्रिज येथील वोल्फसन कॉलेजचे लाइफ मेंबरआहेत.
श्री. त्रिविक्रम यांनी नान्यांग टेक्नॉलॉजी युनिवर्सिटी, सिंगापूर येथून नान्यांग स्कॉलर म्हणून अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग पदवी घेतलेली आहे, तसेच युनिवर्सिटी ऑफ केंब्रिज येथून गेटस केंब्रिज स्कॉलर म्हणून मास्टर्सची पदवी घेतलेली आहे व त्यांना सर फ्रेडरिक अल्फ्रेड वॉरेन प्राइज देण्यात आले होते. त्यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूल, यूएसए येथून जनरल मॅनेजमेंट विषयात डिस्टिंक्शनसह एमबीएची पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांनी मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी, यूएसए येथून रिन्यूएबल अँड सस्टेनेबल एनर्जीमधील अॅडव्हान्स्ड कोर्सही पूर्ण केलेला आहे.
श्री. महेश विश्वनाथ अय्यर, संचालक (व्यवसाय विकास) गेल (इंडिया) लिमिटेड (गेल) ह्यांची बोर्डावर संचालकपदी नेमणूक झाली आहे आणि ते 01 सप्टेंबर 2022 रोजीपासून महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियु्क्त झाले आहेत.
श्री. अय्यर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांच्याकडे गॅस पाइपलाइन्स, एलएनजी टर्मिनल्स, रीन्युएबल्स, इ. क्षेत्रातील रु. 40,000 कोटींच्या घरात जाणाऱ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा, 36 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अनुभव आहे. ते लक्ष्यभेदी व्यावसायिक असून, त्यांनी प्रकल्पांमध्ये आणि ओ अँड एम भूमिकांमध्ये सातत्याने लक्ष्यपूर्ती केली आहे.
श्री. अय्यर हे विविध दीर्घकालीन आणि लघुकालीन धोरणांच्या अंमलबजावणीकरिता गेलच्या कोर टीमचे सदस्य राहिले आहेत. श्री. अय्यर हे कोंकण एलएनजी लिमिटेडच्या आणि सेंट्रल यु.पी. गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदावर ओएनजीसी त्रिपुरा पॉवर कंपनी लिमिटेडचे संचालकपद देखील भूषवत आहेत.
श्री. आशु सिंघल यांची महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या बोर्डावर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून २३ डिसेंबर २०२२ पासून नेमणूक करण्यात आलेली आहे.
श्री. सिंघल हे एनआयटी, सिल्चर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असून त्यांनी ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशनसह बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पदवी संपादन केली आहे. येथे रुजू होण्यापूर्वी, ते गेल (इंडिया) लिमिटेड येथे कार्यकारी संचालकाच्या रूपाने कॉर्पोरेट स्ट्रॅटजी, प्लॅनिंग अँड ॲड्व्होकसी, रिस्क मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागांचे प्रमुख होते, व त्याच वेळी त्या संस्थेचे चिफ रिस्क ऑफिसर म्हणून देखील कार्यरत होते.
ते ओएनजीसी पेट्रो ॲडिशन्स लि. (ओपीएएल) च्या आणि तालचेर फर्टिलायझर लि. (टीएफएल) च्या मंडळावर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. ह्यापूर्वी ते महानगर गॅस लि. (एमजीएल) च्या मंडळावर संचालक राहिलेले आहेत.
श्री. सिंघल ह्यांच्याकडे हायड्रोकार्बन क्षेत्राचा ३१ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट नीती, मोठ्या पातळीवरील प्रकल्पांची अंमलबजावणी उदाहरणार्थ देशभरात गॅस पाइपलाइन्स, पेट्रोकेमिकल आणि एलएनजी अशांसारख्या विभिन्न कार्यक्षेत्रांचा समावेश होतो. त्यांनी गेलच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च व्यवस्थापनासोबत जवळून काम केले आहे, त्याबरोबरच विविध बहुस्तरीय संस्था, औद्योगिक संघटना, समित्या आणि विचार मंचांमध्ये नैसर्गिक वायूच्या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमांतर्गत हितसंबंधींचा सहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी मध्यस्थाचे काम केले आहे.
जवळपास रु. २०,००० कोटी एवढा केपेक्स असणाऱ्या अनेक महाप्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात श्री. सिंघल ह्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे ज्यामध्ये देशभरात गॅस पाइपलाइन्स बसवणे आणि पाटा, उ.प्र. येथे नैसर्गिक वायू आधारित संकलित पेट्रोकेमिकल विस्तार प्रकल्प राबवणे इ. चा समावेश होतो. त्यांनी गेलमध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशनच्या कामाचे नेतृत्व केले ज्यामुळे कामकाजातील कार्यक्षमता, खर्चातील घट आणि उत्पन्नातील वाढीमार्फत रु. १००० कोटींहून अधिक लाभ जमा / वसुल करता आला.
गेलचे चीफ रिस्क अँड स्ट्रॅटजी ऑफिसर म्हणून - त्यांनी यशस्वीपणे एलएनजी कंत्राटांमधील मूल्य जोखीम, निर्देशांक जोखीम (एचएच, ब्रेंट), आणि चलन जोखीम हाताळली ज्यांचा नक्त नफ्यावर परिणाम होतो. श्री. सिंघल ह्यांनी भारतीय औद्योगिक शिष्टमंडळाचे युएस सरकारच्या ख्यातनाम इंटरनॅशनल लीडरशीप प्रोग्रॅममध्ये प्रतिनिधित्व देखील केले आहे.
श्री. संजय शेंडे यांची महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) यांच्या बोर्ड (संचालक मंडळ) वर डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून २४ मे, २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्री. संजय शेंडे यांना बी२बी सेल्स, एक्स्पोर्टस (निर्यात) आणि मार्केटिंग विभागातील जवळजवळ तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते एक प्रशिक्षित सिव्हिल इंजिनिअर असून त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनऊ येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट मिळवलेला आहे.
त्यांनी त्यांच्या करियरची सुरूवात जीएआयएल (GAIL) येथे उत्तर प्रदेश येथील पाटा येथील पेट्रोकेमिकल काँप्लेक्सच्या उभारणीच्या दरम्यान केली. पॉलिमरसाठीची लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन उभी करणे हे त्यांचे काम होते. त्यानंतर, सन २००० पासून त्यांनी मुंबई झोनल ऑफिस येथे काम केले. त्यात महाराष्ट्र व गोवा येथील पॉलिमर सेल्सच्या बाबतीत त्यांनी केलेल्या विशेष कार्यामुळे हे भाग जीएआयएलच्या सर्वात जास्त विक्रीच्या तीन झोन्सपैकी एक ठरले. त्यांनी जीएआयएलमध्ये डीम्ड एक्स्पोर्ट ऑफ पॉलिमर्स सुरू करण्याच्या बाबतीत प्रमुख कामगिरी बजावली होती. शिवाय, दहेज उरण दाभोळ पाइपलाइनच्या उभारणीच्या टप्प्यात, त्यांनी नेतृत्व केलेले होते व थ्री लेयर पीई कोटिंगसाठी इनहाऊस कंपाऊंडिंगची सुरूवात केली होती, ज्यासाठी जीएआयएलच्या एचडीपीइचा उपयोग लाइन पाइप्सच्या कोटिंगसाठी करण्यात आला होता.
दहेज उरण दाभोळ पनवेल पाइपलाइन्स (२००८) कार्यान्वित केल्यानंतर आणि महाराष्ट्र व गोवा मार्केटमध्ये आरएलएनजीचे आगमन झाल्यानंतर श्री. शेंडे यांनी आरएलएनजी सेल्सकडे विशेष लक्ष दिले व त्या विभागाचे नेतृत्व केले.
२०११ मध्ये, ते जीएआयएलच्या अहमदाबाद झोनल ऑफिसमध्ये रूजू झाले आणि त्यांनी नॅचरल गॅस, पॉलिमर व लिक्विड हायड्रोकार्बन्सच्या गुजरात मार्केटमधील मार्केटिंग विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले, ज्याद्वारे जीएआयएलच्या एकूण उत्पन्नापैकी जवळजवळ २५% उत्पन्न मिळत होते. २०१५ ते २०१८ या काळात, त्यांनी नॉइडा येथे पेट्रोकेमिकल्स मार्केटिंग ग्रुपचे प्रमुख म्हणून काम केले, ज्यात विविध धोरणांची रचना करणे व पॉलिमर्सच्या प्राइसिंगविषयीची धोरणे ठरवणे हे त्यांचे मुख्य काम होते.
२०१८ पासून, ते जीएआयएलच्या हैदराबाद झोनल ऑफिसचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत, ज्यामध्ये जीएआयएलच्या मार्केटिंगचे काम तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांमधील बाऊंडरी मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.
जीएआयएलमध्ये रूजू होण्यापूर्वी, श्री. शेंडे यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड येथे काम केले होते.
श्री. राजेश पी वागळे आमच्या कंपनीचे विपणन प्रमुख आहेत. हे आमच्या कंपनीत २२ जुलै २००२ रोजी सामील झाले आहेत. ते इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय, अर्बना शॅम्पेन येथून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर मास्टर्स पदवीही मिळवली आहे. आमच्या कंपनीमध्ये, ते विपणना आणि सीआरएम ग्रूप्सचे कार्यप्रमुख आहेत. आमच्या कंपनीत सामील होण्यापूर्वी, त्यांनी क्वाँटम इन्फॉर्मेशन सिस्टीम्स लिमिटेड, एनरॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गेल ह्यांसोबत काम केले आहे
श्री. बलदेव सिंह ह्यांची २८ एप्रिल २०२१ पासून संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. सिंह महाराष्ट्र कॅडरचे १९८९ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी असून ते कलाशाखेमधील पदवीधर आहेत; त्यांनी फायनान्स आणि मार्केटिंग ह्यामध्ये स्पेशलायझेशन करून व्यवसाय प्रशासनामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सोशल स्टडीज् (आयएसएस) नेदरलँड येथून गव्हर्नन्स, डेमॉक्रटायझेशन अँड पब्लिक प्रॉपर्टी आणि बर्कले (युसीबी), कॅलिफोर्निया येथून डोमेस्टिक फंडिंग ऑफ फॉरेन ट्रेनिंग (डीएफएफटी) ह्यामध्ये अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.
श्री बलदेव सिंह ह्यांची अलीकडे अतिरिक्त प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, ह्या पदी नेमणूक झाली आहे. ह्या अगोदर, त्यांनी महाराष्ट्राच्या प्रमुख निवडणूक अधिकाऱ्याची (सीईओ) भूमिकाही बजावली आहे.
त्यांच्या ३० वर्षांच्या कारकीर्दीमध्ये, त्यांनी विविध भूमिका पार पाडत राज्याची आणि देशाची सेवा केली आहे. त्यांनी भूतकाळात बजावलेल्या काही महत्त्वाच्या भूमिका आहेत विकास आयुक्त, सांताक्रूझ एक्सक्लुझिव्ह एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (सीप्झ), स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) मुंबई, वाणिज्य विभागाअंतर्गत आणि प्रमुख सचिव, कामगार विभाग, महाराष्ट्र सरकार.
श्री. सय्यद एस. हुसैन ९ सप्टेंबर २०१९ पासून स्वतंत्र नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक पदी नियुक्त झाले आहेत.
श्री. हुसैन पटना विद्यापीठातून इंग्लिशमध्ये बी.ए. (ऑनर्स) झाले आहेत व पर्शियनमध्ये त्यांनी डिस्टिंक्षन मिळवले आहे आणि इंग्लिशमध्ये एम.ए. झाले आहेत. त्यांनी यॉर्क युनिवर्सिटी, युके येथून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस अँड डेव्हलपमेंट प्रॉब्लेम्समध्ये एमएससी सुद्धा पूर्ण केले आहे. ते इंडियन रेव्हेन्यु सर्व्हिसेसच्या (आयआरएस) १९७३ च्या बॅचचे असून इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (आयएएस), महाराष्ट्र कॅडरच्या १९७६ बॅचचे आहेत. श्री. हुसैन सिटी अँड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (सिडको) च्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ह्या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी जेएनपीटीचे अध्यक्ष आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र सरकार म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी सार्वजनिक आरोग्य, महसूल, वन आणि ग्रामीण विकास विभागांच्या प्रमुख सचिवांच्या भूमिकाही बजावल्या आहेत. ते जिल्हा परिषद, नागपुरचे सीईओ होते आणि महाराष्ट्रातील लातुर व नाशिक येथील जिल्हाधिकारी व दंडाधिकारी होते.
श्री. सय्यद हुसैन ह्यांना त्यांच्या जेएनपीटीच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत लीडरशीप अँड एक्सलेन्स अवॉर्ड्स शिपिंग, मरीन अँड पोर्ट्स २०१० मध्ये 'बिझनेस लीडर ऑफ द इयर - पोर्ट्स' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तसेच "मॅरिटाइम गेटवे - मेजर पोर्ट ऑफ द इयर" पुरस्कारानेही त्यांना सलग दोन वर्षे गौरवण्यात आले आहे.
श्री. राजीव भास्कर साही ह्यांची 24 ऑगस्ट 2021 पासून स्वतंत्र नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी नेमणूक झाली आहे.
श्री राजीव भास्कर साही ह्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण (एमबीए) इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून फायनान्स आणि मार्केटिंग (वित्त आणि विपणन) मध्ये केले आहे. त्यांनी इंटरनॅशनल कोलंबिया युनिव्हर्सिटी - कोलंबिया बिझनेस स्कूल, युएसए येथून ब्रँड व्यवस्थापनामध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट प्रोग्रॅमसुद्धा पूर्ण केला आहे.
श्री. साही ह्यांच्याकडे पेट्रोलियम, मीडिया, हॉस्पिटॅलिटी, शिक्षण आणि रीटेल क्षेत्रातील 35 वर्षांचा वैविध्यपूर्ण अनुभव आहे. त्यांनी कॉर्पोरेट नियोजन, परिचालने, रसदशास्त्र (लॉजिस्टिक्स), वित्त, विक्री आणि विपणन, संस्थात्मक पुनर्रचना आणि मुळापासून प्रकल्प अंमलबजावणी अशा अनेक कामांमध्ये नेतृत्व केले आहे.
ते सध्या मुंबई येथे स्थित रामकृष्ण मिशन येथे स्वयंसेवक आहेत. श्री. राजीव साही हे 2012 ते 2016 दरम्यान क्वालिटी ग्रूप ऑफ कंपनीज्, दिल्ली ह्या समूहाचे सीईओ होते. ते 2010 ते 2011 करिअर नॉलेज रीसोर्सेस प्रा.लि. चे सीईओ होते. त्यांनी 2008 ते 2009 दरम्यान इंटरनॅशनल बिझनेस ऑफ एस्सेल ग्रूप कॉर्पोरेट रीसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडसाठी सीईओ म्हणूनही काम केले आहे. ते 2001 ते 2008 ह्या काळात रीलायन्स इंडस्ट्रीज् लिमिटेडच्या रीटेल पेट्रोलियम बिझनेसचे अध्यक्ष होते. त्यांनी 1981 ते 2001 पर्यंत भारत पेट्रोलियममध्ये महाव्यवस्थापक पदासह इतर विविध पदे भूषविली आहेत.
श्रीमती. मालविका सिन्हा ह्यांची 24 ऑगस्ट 2021 पासून स्वतंत्र नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी नेमणूक झाली आहे.
श्रीमती. मालविका सिन्हा ह्यांच्याकडे वूडरो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक अँड इंटरनॅशनल अफेअर्स, प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, युएसए येथील सार्वजनिक प्रशासनामधील मास्टर्स पदवी आहे. आणि मुंबई विद्यापीठातून कला शाखेत मास्टर्स पदवी आहे. तसेच, त्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकिंगच्या सर्टिफाइड असोसिएट आहेत
श्रीमती. सिन्हा ह्या 1982 मध्ये भारतीय रीझर्व्ह बँकेमध्ये सेंट्रल बँकर म्हणून रुजू झाल्या आणि विविध भूमिकांमध्ये भारतीय रीझर्व्ह बँकेमध्ये (आरबीआय) 38 वर्षे काम केल्यानंतर, त्या फेब्रुवारी 2020 मध्ये कार्यकारी संचालकपदावरून निवृत्त झाल्या. आरबीआयमध्ये कार्यकारी संचालक म्हणून, त्या मनुष्यबळ विकास, विदेशी चलन विभाग, अंतर्गत कर्ज व्यवस्थापन विभाग आणि ठेव विमा आणि क्रेडिट हमी विभाग ह्यांच्या प्रमुख होत्या आणि त्यांच्याकडे ह्या विभागांच्या परिचालनाची तसेच ह्या क्षेत्रांमधील धोरण सूत्रीकरणाची कार्यकारी जबाबदारी होती. आरबीआयच्या सुमारे 15,000 कर्मचार्यांची नेमणूक, पदनियुक्ती, बढती, प्रशिक्षण, औद्योगिक नातेसंबंध आणि धोरणे ह्यांसाठी त्या जबाबदार होत्या.
त्यांनी बिकानेर आणि जयपूर स्टेट बँकेच्या मंडळावर ती एसबीआयमध्ये विलीन होण्यापूर्वी आरबीआयच्या नामनिर्देशित संचालिका म्हणून काम केले आहे. त्या इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग अँड फायनान्स आणि इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन ह्या दोहोंच्या नियामक मंडळावरही होत्या.
श्री. वेंकटरामन श्रीनिवासन ह्यांची 24 ऑगस्ट 2021 पासून स्वतंत्र नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदी नेमणूक झाली आहे.
श्री. वेंकटरामन श्रीनिवासन इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) चे फेलो सदस्य आहेत. त्यांनी कॉमर्समध्ये मुंबईतील सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलतर्फे ऑगस्ट 2010 मध्ये घेण्यात आलेल्या ‘ऑडिट कमिटीज् इन दि न्यू एरा ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता.
श्री. वेंकटरामन श्रीनिवासन व्ही. शंकर अय्यर अँड कं. मध्ये भागीदार आहेत. ते 1984 पासून लेखापरीक्षण आणि अशुरन्स प्रॅक्टिस तसेच प्रत्यक्ष कर आणि कॉर्पोरेट समुपदेशन सेवांमध्ये कार्यरत आहेत. बँका, म्युच्युअल फंड्स आणि वित्तीय संस्थांचे तसेच सार्वजनिक मालकीच्या संस्थांचे सांविधिक लेखापरीक्षण करण्यात तसेच प्रत्यक्ष कर, कंपनी कायदा, स्पर्धा कायदा, विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) प्रकरणांत समुपदेशन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
ते 2021-22 मध्ये आयसीएआयच्या तज्ज्ञ सल्लागार समितीचे (ईएसी) सदस्य म्हणून निवडले गेले होते. 2013-14 वर्षामध्ये ते आयसीएआयच्या वित्तीय अहवाल आढावा मंडळातर्फे (एफआरआरबी) तयार केलेल्या विशेष गटाच्या मंडळाचे सदस्य होते.
श्री. प्रेमेश कुमार जैन यांची स्वतंत्र नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून दिनांक 9 एप्रिल 2018 पासून नेमणूक करण्यात आलेली आहे.
श्री. प्रेमेश कुमार जैन, पूर्वीचे डायरेक्टर (फायनान्स) गेल यांना जीएआयएलमध्ये बोर्ड स्तरीय कामाचा आणि जीएआयएलच्या विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सबसिडी कंपनीजमधील 6 वर्षांचा अनुभव आहे , उदा. जीएआयएल ग्लोबल (सिंगापूर) पीटीइ. लिमिटेड, जीएआयएल गॅस लिमिटेड, बीसीपीएल, चायना गॅस लिमिटेड आणि जेल चायना गॅस ग्लोबल एनर्जी होल्डिंग लिमिटेड. त्यांनी बोर्डाच्या विविध समित्यांवर, कंपनीच्या पीएफ ट्रस्ट, ग्रॅच्युइटी फंड ट्रस्ट वरही चेअरमन/सभासद म्हणून काम केलेले आहे.
ते चार्टर्ड अकाऊंटंट व एमबीए (युनिवर्सिटी ऑफ हल, यूके) असून त्यांना ऑइल व गॅस क्षेत्रातील कामाचा जवळजवळ 35 वर्षांचा अनुभव आहे, ज्यात फॉरेक्स रिस्क मॅनेजमेंट व हेजिंग पॉलिसीचे कार्यान्वयन, कॅपिटल बजेटिंग, कॉपोरेट बजेटस, कॉपोरेट अकाऊंटस, काँट्रॅक्ट मॅनेजमेंट, फायनलायझेशन ऑफ लाँग टर्म एलएनजी व गॅस अॅग्रीमेंटस, लिक्विफिकेशन व रीगॅसिफिकेशन टर्मिनल सर्विस अॅग्रीमेंटस, शेअरहोल्डर अॅग्रीमेंटस व जॉइंट व्हेंचर अॅग्रीमेंटस इ. चा समावेश आहे. त्यांनी पीएनजीआरबी बरोबर अनेक विषयांसाठी बोलणी केलेली आहेत ज्यात विविध पाइपालाइन्ससाठी टॅरिफ निश्चित करणे, पीएनजीआरबी/एपीटीइएल यांचेबरोबर विविध मुद्यांबद्दल बोलणी करणे/समस्या सोडवणे, नॅचरल गॅस पाइपलाइन आणि सीजीडीबाबत विविध शहरांमध्ये जीएआयएल, त्यांच्या सबसिडीज, जेव्ही द्वारे बिडिंग प्रोसेसमध्ये सहभाग घेणे यांचा समावेश आहे.
श्री. जैनेन्दर कुमार जैन यांची स्वतंत्र अ-कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
६९ वर्षे वयाचे श्री. जैन, जे गेलचे माजी-संचालक (फायनान्स) आहेत, चार्टर्ड अकाउंटन्ट आणि इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस् ऑफ इंडियाचे फेलो मेंबर आहेत. त्यांना विविध संघटनांमधील वित्तीय कार्यातील बत्तीस वर्षंचा अनुभव आहे. श्री. जैन १९९६ पासून २००५ पर्यंत गेलमध्ये संचालक (फायनान्स) होते. जानेवारी १९९८ ते ऑगस्ट २००३ दरम्यान ते महानगर गॅस लिमिटडेच्या मंडळावर नामनिर्देशित संचालक होते. पूर्वी ते अनेक कंपन्यांव्यतिरिक्त, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या मंडळावर होते. श्री. जे. के. जैन, सध्या मे. जमना ऑटो इंडस्ट्रीज् लिमिटेड आणि मे. इआयसीएल लिमिटेडच्या मंडळावर संचालक आहेत. श्री. जे. के. जैन यांना, वित्त, गुंतवणूक, निधीपुरवठा, अनुपालन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, जोखीम व्यवस्थापन वगैरेंमधील प्रचंड अनुभव आहे.
श्री. अरुण बालाकृष्णन् यांची स्वतंत्र अ-कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
६४ वर्षे वयाचे श्री. अरुण बालाकृष्णन् जे जुलै २०१० मध्ये हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) मधून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले, त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, त्रिचूर, केरळ मधून बी.ई. (केमिकल) पदवी प्राप्त केली आहे आणि ते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोरमधील व्यवस्थापनातील १९७६ चे पदव्युत्तर पदविका धारक आहेत. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोरतर्फे त्यांना "डिस्टींग्वीशड् अॅलुम्नी अॅवॉर्ड २००८" प्रदान करण्यात आले आहे.
श्री. अरुण बालाकृष्णन् मे. एचपीसीएल-मित्तल पाइपलाइन्स लिमिटेड, मे. एनसीडीइएक्स इ-मार्केटस् लिमिटेड, मे. लिन्डे इंडिया लिमिटेड, मे. जेपीइन्फ्राटेक लिमिटेड, मे. केएसएस ग्लोबल बीएलव्ही, मे. अँट्रीक्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मे. जयप्रकाश पॉवर व्हेन्चर्स लिमिटेडच्या संचालक मंडळांवर सुद्धा ते संचालक आहेत. त्या व्यतिरिक्त, श्री. बालाकृष्णन् यांची इंस्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स, बंगलोरचे मानद अध्यक्ष म्हणून सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. संतोष कुमार यांची स्वतंत्र अ-कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
श्री. संतोष कुमार, जे गेलमध्ये संचालक (प्रकल्प)) म्हणून निवृत्त झाले, मोतीलाल नेहरू इंजिनियरिंग कॉलेज, अलाहाबाद (१९७० ची तुकडी) मधील इलेक्ट्रिकल इंजिनीयर आहेत. त्यांना फर्टिलायझर्स आणि टेलीकॉममधील आणि त्यानंतर भारतातील तेल आणि वायू उद्योगातील, खास करून मनुष्य बळ विकास कौशल्याच्या क्षेत्रातील समृद्ध आणि विविध प्रकारचा मोठ्या कालावधीचा आणि नंतर प्रोजेक्ट अॅक्टिविटीजचे प्रमुख म्हणून आणि त्यानंतर भारताच्या आदरणीय राष्ट्रपतींनी गेलच्या संचालक मंडळावर संचालक(प्रकल्प) म्हणून नेमणूक केल्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे.
श्री. संतोष कुमार नोव्हेंबर २००६ ते जून २००९ दरम्यान गेलमध्ये संचालक (प्रकल्प) होते. त्यांच्या गेलमध्ये कार्यकालात, ते ग्रीन गॅस लिमिटेड, लखनौ आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष सुद्धा होते, आणि सेंट्रल युपी गॅस लिमिटेड, कानपूर, एनएटीजीएएस, इजिप्त आणि जीएसइजी च्या संचालक मंडळावर होते आणि रत्नागिरी गॅस अँड पॉवर लिमिटेड, दाभोळच्या पहिल्या संचालक मंडळाचे सदस्य होते. सप्टेंबर प्टें २००९ ते ऑगस्ट २०१० दरम्यान ते जीअसपीएल, अहमदाबाद यांच्याकडे सल्लागार होते.
ते मे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक सुद्धा आहेत. श्री. कुमार प्रोजेक्ट फायनान्स, एसबीयु, स्टेट बँक ऑफ इंडियासाठी संमंत्रक (तेल आणि वायू) सुद्धा आहेत.
श्री. राजीव माथुर व्यवसायाने एक अभियंता आहेत, त्यांच्यापाशी मार्केटिंग मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधील मास्टर पदवी आहे आणि त्यांनी नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उद्योगात तीन दशकांचा विस्तृत अनुभव घेतला आहे.
श्री. माथुर यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात गेलच्या स्थापनेपासून केली आणि त्यांना कार्यकारी संचालक (मार्केटिंग) च्या पदावर पदोन्नती देण्यात आली. गॅस उद्योगातील त्यांच्या ३० वर्षांच्या समृद्ध अनुभवाने त्यांनी मार्केटिंग आणि बिझनेस डेवलपमेंट क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रोफाइल्सखाली अनेक पुढाकारांना चालना दिली. त्यांना नेमून दिलेल्या कामांमध्ये गेलमध्ये नॅशनल गॅस ट्रेडिंग, गॅस ट्रान्समिशन आणि भारतात आणि परदेशांत इतर संबंधित उत्पादनांचे मार्केटिंगवर लक्ष एक इन-चार्ज रेग्युलेटरी अफेअर्स डिपार्टमेंट म्हणून नियामक चौकटीचे पालन करणे, किंमत ठरविणे, कंत्राट व्यवस्थापन आणि उच्च हितसंबंधांची कायदेशीर प्रकरणे तसेच हितसंबंधियांना म्हणजेच गुंतवणूकदार, महत्त्वाची मंत्रालये, औद्योगिक चॅंबर्स वगैरेंना हाताळणे यांचा समावेश होता. ते इंद्रप्रस्थ गॅस लि. (दिल्लीतील एक शहर वायू वितरण कंपनी) चे आर्थिक दूरदर्शित्वाच्या दृष्टीने कॉर्पोरेट गव्हर्नन्सची खात्री करणारे, भागधारकांचे मूल्य वाढवण्यासाठी धोरणात्मक व्यवसाय योजना तयार करणारे प्रवर्तक नामनिर्देशिती होते.
उपरोक्त शिवाय, श्री. माथुर यांनी ८ व्या एशिया गॅस पार्टनरशिप समीटच्या (एजीपीएस) (दक्षिण आशियातील सर्वात मोठा गॅसच्या संबंधातील कार्यक्रम) समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, उर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले, एमओपीएनजीसाठी नैसर्गिक वायूकरिता अॅप्रोच पेपर तयार करण्यासाठी नैसर्गिक वायूवरील उप गटाचे एक समन्वयक म्हणून काम केले. श्री. माथुर, एमओपीएनजीशी, नॅशनल गॅस रेग्युलेटरी बिल, २००१ तयार करणे, रचना करणे आणि मसूदा तयार करणे या संबंधात निगडित होते.
अलीकडेच, महानगरगॅसचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर ते मुंबईत रुजू झाले आहेत.
श्रीमती सुस्मिता सेनगुप्ता यांची फेब्रुवारी १५, २०१४ पासून प्रभावाने मंडळावर तांत्रिक संचालिका म्हणून नेमणूक झाली आहे.
महानगर गॅस लिमिटेड मध्ये रुजू होण्यापूर्वी, त्यांनी डीसीपी मिडस्ट्रीम, डेनवर मिडलँड सीओ/टीएक्स, यूएसए येथे संचालिका - इंजिनियरिंग - प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून पद भूषविले होते. कुमारी सेनगुप्ता यांनी, इतर बाबींबरोबरच, इंटर्नल आणि मल्टी-फॅसेटेड ऑपरेटिंग अॅसेटस् (पाइपलाइन, काँप्रेसर स्टेशन्स, प्रोसेसिंग प्लँटस्) साठी एपीसीएम इंजिनियरिंग/कंस्ट्रक्शन कामांचे नेतृत्व केले होते. त्यांनी प्रोजेक्ट कंट्रोल/फोरकास्टिंग/रिपोर्टिंगच्या कामावर हँडस्-ऑन मॅनेजमेंट पुरविली होती. त्यांनी प्रमाणीकरण, पद्धती, कार्यपद्धती यांची गरज असलेले इंजिनियरिंग आणि एचएसइ सुद्धा तयार केले आणि राबविले होते आणि कर्मचारी आणि एपीसीएमच्या कामगिरीचे व्यवस्थापन केले होते आणि कामगिरीचा आढावा घेतला होता.
त्यांच्या पूर्वीच्या अनुभवात इतरांपैकी इएनओजीइएक्स/ओजीइ, ओक्लाहोमा शहर, ओके, युएसए साठी प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन म्हणून, गॅस सिस्टीम्स, बर्लींग्टन, व्हीटी, युएसएसाठी अभियांत्रिकी व्यवस्थापक, इंजिनियरिंग आणि करोजन डिपार्टमेंट म्हणून, मिचकॉन गॅस कंपनी, डेट्रॉइट, एमआय, युएसए साठी फॉर्मल लीडर, दक्षिण पूर्व विभाग, बांधकाम आणि देखभाल म्हणून, ब्रिटीश गॅस पीएलसी., लंडन/लफबरोज, आणि युकेसाठी प्रोग्राम मॅनेजर म्हणून केलेल्या कामांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकालातील जबाबदाऱ्यांमध्ये, प्रोजेक्ट बजेट कंट्रोल आणि फायनान्शियल रिपोर्टिंगच्या सर्व पैलूंचे व्यवस्थापन, कंपनीच्या विनिर्दिष्टांनुसार आणि नियामक प्रमाणांनुसार)प्रकल्प पुढे नेला जात आहे आणि करारानुसार अंमलबजावणी केली जात आहे याची खात्री करणे आणि ग्रुप बिझनेस प्लॅन्स आणि बजेटस् सांभाळणे यांचा समावेश होता.
श्रीमती सुस्मिता सेनगुप्ता या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरी, अल्बर्टामधून केमिकल आणि पेट्रोलियम इंजिनियरिंगमधून एम. एससी. झाल्या आहेत आणि अल्बर्टा ऑइल सँडस् टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अॅथॉरिटी स्कॉलरशिपच्या त्या एक एओएसटीआरए स्कॉलर आहेत. प्रोफेशनल इंजिनियर्स, कॅनडा, पाइपलाइन इन्स्पेक्टर्स सर्टिफिकेशन, कॅनडा आणि जीआरइ/पीआरसीआय एनडीटी कमिटी नॉर्थ इस्ट गॅस असोशिएशन, एजीए, एएसएमइ, एसीएचइशी त्या संलग्न आहेत.
श्री. सुनील एम रानडे आमच्या कंपनीचे प्रमुख वित्तीय अधिकारी आहेत. ते आमच्या कंपनीमध्ये १ मार्च १९९६ रोजी सामील झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे.
ते इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य आहेत तसेच इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाचेही सदस्य आहेत. आमच्या कंपनीमध्ये, ते वित्त आणि लेखा समूहाचे कार्यप्रमुख आहेत आणि कंपनीच्या वित्तीय आणि धोरणात्मक उद्दिष्टांना साध्य करण्याशी संबंधित वित्त, लेखा आणि पूर्वानुमानाचे व्यवस्थापन करतात. आमच्या कंपनीत सामील होण्यापूर्वी, ते वाँडर लिमिटेडमध्ये वित्तीय व्यवस्थापक आणि कंपनी सचिव होते. त्यांनी हर्डिल्ला पॉलिमर्स लिमिटेड, नॅशनल पेरॉक्साइड लिमिटेड, गूडलास नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि अशोक ऑरगॅनिक इंडस्ट्रीज् लिमिटेड ह्यांच्यासोबतही काम केले आहे.
श्री. राजेश पी वागळे आमच्या कंपनीचे विपणन प्रमुख आहेत. हे आमच्या कंपनीत २२ जुलै २००२ रोजी सामील झाले आहेत. ते इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर आहेत. युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय, अर्बना शॅम्पेन येथून त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर मास्टर्स पदवीही मिळवली आहे. आमच्या कंपनीमध्ये, ते विपणन आणि सीआरएम ग्रूप्सचे कार्यप्रमुख आहेत. आमच्या कंपनीत सामील होण्यापूर्वी, त्यांनी क्वाँटम इन्फॉर्मेशन सिस्टीम्स लिमिटेड, एनरॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गेल ह्यांसोबत काम केले आहे.
श्री. श्रीनिवासन मुरली आमच्या कंपनीच्या ऑपरेशन अँड मेन्टेनन्सचे प्रमुख आहेत. ते आमच्या कंपनीमध्ये ३ ऑक्टोबर २००२ रोजी सामील झाले. त्यांनी आयआयटी (बीएचयु), पूर्वी आयटी-बीएचयु, मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतलेली आहे. त्यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटी येथून मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा आणि ॲडवान्स्ड डिप्लोमा, तसेच फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमासुद्धा घेतला आहे. आमच्या कंपनीमध्ये, ते ऑपरेशन्स, मेन्टेनन्श, ऑनलाइन डोमेस्टिक कनेक्षन, सीएनजी अपग्रेडेशन आणि मीटरिंग डीपार्टमेंट्सचे कार्यप्रमुख आहेत आणि आमच्या कंपनीच्या मालमत्ता सुरक्षितपणे आणि सर्वाधिक काळ सुरु ठेवून चालवणे आणि जतन करणे ह्यासंबंधित सर्व घडामोडींसाठीचे नेतृत्व व्यवस्थापन आणि दिशा पुरवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आमच्या कंपनीत सामील होण्यापूर्वी, त्यांनी बिल्ट केमिकल्स लिमिटेड, कॅबोट इंडिया लिमिटेड, सीमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि इंडियन ॲल्युमिनिअम कंपनी लिमिटेड ह्यांसह काम केले आहे.
श्री. टी एल शरणागत हे आमच्या कंपनीचे काँट्रॅक्ट्स, प्रोक्युअरमेंट, इन्वेंटरी मॅनेजमेंट आणि स्टोर्स मॅनेजमेंटचे प्रमुख आहेत व चीफ रिस्क ऑफिसर आहेत. ते मे २००८ मध्ये आमच्या कंपनीत सामील झाले. त्यांच्याकडे गव्हर्न्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जबलपुर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बॅचलर पदवी आहे. त्यांच्याकडे मार्केटिंग मॅनेजमेंटमधील एमबीए पदवीसुद्धा आहे. ते आयएसएम युएसए मधून सप्लाय चेन मॅनेजमेंट (सीपीएसएम) मधील प्रमाणित व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे निर्यात व्यवस्थापनातील डिप्लोमा आहे. संस्थेच्या सर्व सप्लाय चेन, इन्वेंटरी आणि प्रोक्युअरमेंट घडामोडींचे नेतृत्व, व्यवस्थापन आणि दिग्दर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. श्री. शरणागत ह्यांच्याकडे पर्चेसिंग, काँट्रॅक्ट्स, इम्पोर्ट्स, इन्वेंटरी मॅनेजमेंट ह्यांमधील ३० वर्षांचा अनुभव आहे ज्यामध्ये एसएपी इम्प्लिमेंटेशन सारख्या मल्टि डोमेन कौशल्याचाही समावेश होतो. आमच्यासोबत काम करण्यापूर्वी, ते एल अँड टी आणि गेल (इंडिया) लिमिटेड ह्यांसारख्या संस्थासोबत काम करत होते.
श्री. चक्रपाणी आत्मकुर हे आमच्या कंपनीच्या मानव संसाधन आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे उपाध्यक्ष आहेत. ते जानेवारी २०१९ मध्ये कंपनीत सामील झाले. त्यांनी एसके विद्यापीठ, अनंतपुर, आंध्र प्रदेश येथून मानव संसाधनामध्ये एमबीए केले आहे. ते मानव संसाधनाचे कार्यप्रमुख आहेत व त्यांच्याकडे मार्गदर्शनाची, व्यवस्थापनाची आणि संस्थेकरिता लोकांच्या कार्याच्या धोरण पुरवठ्याची जबाबदारी आहे. श्री. चक्रपाणी ह्यांना मनुष्य संसाधन क्षेत्रात २८ हून अधिक वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. आमच्यासोबत काम करण्याआधी, त्यांनी एसआय ग्रूप (इं) प्रा. लि., ओव्हेन्स कॉर्निंग (इ) लि. आणि मे. इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन अशा संस्थांसोबत काम केले आहे.
श्री. गुरविंदर सिंह हे १२ जून २०१९ रोजी महानगर गॅस लिमिटेडमध्ये सामील झाले आहेत.
ते एक प्रमाणित प्रकल्प व्यवस्थापन व्यावसायिक (पीएमपी) आहेत व त्यांच्याकडे तेल आणि वायु क्षेत्रात २९ वर्षांहून जास्त अनुभव आहे. त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगढ येथून बीई (मेकॅनिकल) केले आहे तसेच एमएससी (एन्व्हायर्न्मेंटल सायन्स) सुद्धा केले आहे. एमजीएल मध्ये, ते पीएनजी प्रकल्प, पोलाद प्रकल्प, एलएनजी आणि सीएनजी प्रकल्प यांचे कार्यप्रमुख आहेत. एमजीएलमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी नयारा एनर्जी लिमिटेड (पूर्वी एस्सार ऑइल लिमिटेड) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे काम केले आहे. त्यांनी बांधकाम, रीटेल डिझाईन आणि अभियांत्रिकी, विपणन, व्यवसाय विकास, परिचालने आणि एचएसएसई मध्ये विविध भूमिका बजावल्या आहेत.
श्री. राजेश डी. पटेल हे आपल्या कंपनीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर आहेत. त्यांनी 9 एप्रिल 2009 रोजी आपल्या कंपनीत प्रवेश केला. त्यांच्याकडे मुंबई विद्यापीठातून मिळवलेली बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी आहे. ते इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (एफसीए) चे सहाध्यायी सदस्य आहेत, चार्टर्ड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंत अकाऊंटंट्स ऑफ युनायटेड किंग्डमचे (एसीएमए, सीजीएमए) सहयोगी सदस्य आहेत आणि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे स्नातक सदस्य आहेत.
ते वित्त आणि लेखा विभागाचे कार्यकारी प्रमुख आहेत आणि ते वित्त, लेखा, परिव्ययांकन (कॉस्टिंग), अर्थसंकल्पन ह्यांचे व्यवस्थापन करतात व कंपनीची धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या टीमचे सदस्य आहेत.
एमजीएलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, ते अदानी इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स लिमिटेड येथे महाव्यवस्थापक (वित्त) होते. त्यांनी क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज लिमिटेड, फिलिप्स इंडिया लिमिटेड, आणि ॲडलॅब्स फिल्म्स लिमिटेड येथेही काम केले आहे. वित्त, लेखा, परिव्ययांकन (कॉस्टिंग), व्यवस्थापन माहिती यंत्रणा, कराधान (टॅक्सेशन), आणि अंतर्गत लेखापरीक्षणाच्या क्षेत्रांत त्यांना एकूण 27 वर्षांचा अनुभव आहे. ह्याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे सेंट झेव्हिअर्स कॉलेज (कॉमर्स विभाग), मुंबई येथे वित्त आणि संबंधित विषय शिकवण्याचा अनुभवही आहे.
श्री. मानस दास आमच्या कंपनीमध्ये व्यवसाय विकास आणि वाणिज्य क्रियांचे प्रमुख आहेत. ते २४ सप्टेंबर २०२० रोजी महानगर गॅस लिमिटेड मध्ये सामील झाले. ते आयआयटी कानपुर येथून रसायन अभियंता झाले आहेत आणि त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये एमबीए केले आहे. मर्जर्स आणि अक्विझिशन्स, कॉर्पोरेट आणि धोरणात्मक नियोजन, विपणन, व्यवसाय विकास, संस्थात्मक रूपांतरण, शिक्षण आणि विकास आणि प्लांट परिचालने ह्या क्षेत्रांमध्ये त्यांना २९ वर्षांचा अनुभव आहे. ह्याआधी ते मे. वॅल्युएन्डो कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, ह्या व्यवस्थापन समुपदेशन फर्ममध्ये एमडी आणि सीईओ म्हणून कार्यरत होते. त्याआधी ते मे. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशन येथे धोरण सल्लागार म्हणून होते आणि मे. गेल (इंडिया) लिमिटेड येथे विपणन, व्यवसाय विकास, धोरणात्मक नियोजन, संस्थात्मक रूपांतरण आणि परिचालने ह्यांमध्ये विविध नेतृत्वाच्या भूमिका त्यांनी बजावल्या आहेत. एमजीएल मध्ये, ते व्यवसाय विकास, धोरण, वाणिज्य (ह्यामध्ये वायु मिळवणे आणि मूल्यनिर्धारण करणेही समाविष्ट) आणि नियमनाच्या प्रश्नांशी संबंधित सर्व घडामोडींसाठी जबाबदार आहेत.
श्री. अतुल प्रभु हे इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय), इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीडब्ल्युएआय) आणि इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया (आयसीएसआय) चे सहयोगी सदस्य आहेत.
श्री. प्रभु ह्यांच्याकडे इंटर्नल ऑडिट, इंटर्नल कंट्रोल्स, रिस्क मॅनेजमेंट, अकाऊंट्स अँड फायनान्स ह्या क्षेत्रांमधील ज्ञानभांडार असून त्यांना अभियांत्रिकी आणि बांधकाम, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा, उत्पादन, टेलिकॉम, माध्यम आणि मनोरंजन, शिक्षण आणि अर्थसाहाय्य अशा उद्योगक्षेत्रांमधील वैविध्यपूर्ण असा २३ वर्षांहून जास्त अनुभव आहे.
सध्या महानगर गॅस लिमिटेडशी महाव्यवस्थापक (इंटर्नल ऑडिट आणि विजिलन्स) आणि कंपनी अधिसचिव व अनुपालन अधिकारी ह्या भूमिकेत ते संलग्न असून, श्री. अतुल प्रभुंनी ह्याआधी एस्सेल ग्रूप, लार्सन अँड टूब्रो लि., रीलायन्स कम्युनिकेशन्स लि आणि इयॉन एक्सचेंज इंडिया लि. ह्यांच्यासोबत काम केले आहे.