Mahanagar Gas

होमव्यवसायव्यावसायिक पीएनजी

व्यावसायिक फ एक प्रश्न

प्रवर्गात नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे?

देकाराच्या स्वीकारानंतर, ग्राहकाला इच्छित नोंदणी प्रपत्र भरावे लागते आण नोंदणीसाठी आवश्यक बंधनकारक दस्तऐवजांसह अर्ज शुल्क सादर करावे लागते.

पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करण्याकरिता कोणते दस्तऐवज आवश्यक असतात?

ग्राहकाला नोंदणीच्या वेळी पुढील दस्तऐवजांच्या स्व-साक्षांकित प्रती सादर कराव्या लागतातः
ए) पॅन कार्ड आणि व्हॅट टीआयएन (व्हॅट टीआयएन उपलब्ध नसल्यास, त्या अर्थाचे घोषणापत्र).
बी) बीएमसी शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंटस् प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास, मुंबई गुमास्ता लायसन्स व्यतिरिक्त).
सी) जमीन खरेदी करार (मालकीची असल्यास)/करार(भाडेपट्टीचे/भाड्याचे असल्यास).
डी) सोसायटी/जमीनमालकाची एनओसी.

वापर सुरक्षा अनामत रक्कम कशी काढली जाते?

ती तुमच्या एलपीजी/डिझेल वगैरें पर्यायी इंधनांच्या मासिक गॅस वापराच्या आधारे किंवा ग्राहकांनी त्यांच्या नोंदणी प्रपत्रात पुरविलेल्या माहितीच्या आधारे अंदाजे वापरावरून काढली जाते.

मला नोंदणीच्या वेळी वापर सुरक्षा अनामत प्रदान करावी लागेल का?

सध्या सुरक्षा अनामत रुपांतरणानंतर पहिल्या ३ हप्त्यांमध्ये देयकामार्फत घेतली जाते. सुरक्षा अनामत म्हणून जमा केलेल्या रकमेचा त्रैमासिक तत्त्वावर आढावा घेतला जाईल आणि सुरक्षा अनामतीच्या रकमेतील कोणतीही सुधारणा विनंती पत्रामार्फत ग्राहकांना कळवली जाईल.

डाउनस्ट्रीम कंत्राटदाराची नेमणूक कोण करेल?

ग्राहकाला त्याच्या स्वतःच्या खर्चाने रेग्युलेटर/मीटरपासून ते बर्नरपर्यंत अंतर्गत पाइपिंग स्थापित करण्यासाठी प्रतिष्ठित आणि अनुभवी कंत्राटदाराची नेमणूक करणे आवश्यक आहे. पाइपिंगचे काम कठोरपणे एमजीएलच्या विनिर्दिष्टांनुसार आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात यावे. कंत्राटदारांची सूची आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

माझी सध्याची डाउनस्ट्रीम पाइपलाइन पीएनजी पुरवठ्यासाठी वापरली जाऊ शकते का?

ग्राहकाने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, जो एमजीएलद्वारा ऑफर लेटरमध्ये विहीत केलेल्या कोडशी सुसंगत असेल, पाइपिंग कामासाठी कंत्राटदाराशी सल्लामसलत करावी.

मी एमजीएलच्या मान्यताप्राप्त कंत्राटदारांच्या सूचीत नसलेल्या डाउनस्ट्रीम कंत्राटदाराची नेमणूक करू शकतो का?

एमजीएलची मान्यताप्राप्त डाउनस्ट्रीम कंत्राटदारांची सूची सूचनात्मक आहे आणि ग्राहक एमजीएलने ठरवून दिलेल्या विनिर्दिष्टींप्रमाणे आणि अग्नीशमन विभागाच्या पुष्टीने आणि इतर वैधानिक नियमांनुसार आतील पाइपिंगचे काम करतो अशा कोणत्याही डाउनस्ट्रीम कंत्राटदाराची नोमणूक करू शकतो.

जोडणी नवीन मालकाला हस्तांतरणीय आहे का?

जोडणी नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवजांच्या उपलब्धतेच्या आणि विद्यमान वापरकर्त्यांकडून एनओसीच्या अधीन हस्तांतरणीय आहे. हे केवळ अशाच बाबतीत लागू आहे जिथे विद्यमान आणि नवीन व्यावसायिक आस्थापनेची जागा आणि व्यावसायिक लोड सारखाच राहतो.

प्रवर्गात मालकीच्या हस्तांतरणासाठी पद्धत काय आहे?

मालकीच्या हस्तांतरणासाठी खाली नमूद केलेले दस्तऐवज सादर केले जाऊ शकतात:
ए) मालकीच्या हस्तांतरणासाठी विनंती पत्र.
बी) पॅन कार्ड आणि व्हॅट टीआयएन.
सी) बीएमसी शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंटस् प्रमाणपत्र.
डी) जमीन खरेदी करार (मालकीची असल्यास)/करार(भाडेपट्टीचे/भाड्याचे असल्यास).
इ) भागीदारी करार (भागीदारी संस्था असल्यास).
एफ) पूर्वीच्या मालकाची एनओसी.
जी) मालकीच्या हस्तांतरणाप्रती महानगर गॅस निमिटडेच्या नावे रु. २५०/- चा धनादेश.
एच) अर्ज-नि-नोंदणी प्रपत्र.

आणि घरुगुती पीएनजी विभागांसाठी टॅरीफ दर आणि बिलिंग चक्रे वेगळी आहेत का?

होय, आणि घरुगुती पीएनजी विभागांसाठी टॅरीफ दर आणि बिलिंग चक्रे वेगळी आहेत आणि विभागासाठी देयके दर पंधरवड्याला पोचती केली जातात.

पीएनजीसाठीचे दर वारंवार बदलतात का?

सध्या प्रवर्गातील नैसर्गिक गॅसच्या विक्रीची किंमत मुंबईच्या महापालिका सीमांच्या आत वर्षाच्या प्रत्येत महिन्यात लागू असल्याप्रमाणे १९ किग्रा एलपीजी सिलींडरच्या विक्रीच्या किंमतीशी, तात्पुरत्या १०% सवलतीच्या पातळीसह (तरती किंमत) निगडित केलेली आहे. एमजीएल ग्राहकांना कोणतेही कारण देणारी सूचना आधी दिल्याशिवाय उपरोक्त तात्पुरत्या सवलतीत कोणत्याही वेळी सुधारणा/बदल करण्याचा किंवा मागे घेण्याचा किंवा त्यात प्रिमियम अंतर्भूत करण्याचा हक्क राखून ठेवत आहे.

पीएनजी जोडणी न वापरण्याबद्दल कोणतेही किमान आकार आहेत का?

पीएनजी जोडणी न वापरण्यासाठी किमान तूट आकार रु. २५०/- आहे.

देयकांचे प्रदान खालीपैकी कोणत्याही एका पर्यायांमार्फत केले जाऊ शकते-
ए) धनादेश/डीडी प्रदान.
बी) एकतर आरटीजीएस(रु. १ लाखाच्या वर) किंवा एनइएफटी (रु. १ लाखाच्या खाली) मार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रदानाची अतिरिक्त सुविधा.
सी) प्रदान "एसीएच" (ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस) द्वारा सुद्धा केले जाऊ शकते. एसीएचसाठी तुम्हाला ६१८८०६७४/६१८८०६९८ वर संपर्क करणे आवश्यक आहे.

प्रवर्गातील देयकांच्या प्रदानासाठी कोणते पर्याय आहेत?

देयकांचे प्रदान खालीलपैकी कोणत्याही एका पर्यायामार्फत केले जाऊ शकते-
ए) धनादेश/डीडी प्रदान.
बी) एकतर आरटीजीएस(रु. १ लाखाच्या वर) किंवा एनइएफटी (रु. १ लाखाच्या खाली) मार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रदानाची अतिरिक्त सुविधा.
सी) प्रदान "एसीएच" (ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस) द्वारा सुद्धा केले जाऊ शकते. एसीएचसाठी तुम्हाला ६१८८०६७४/६१८८०६९८ वर संपर्क करणे आवश्यक आहे.

देयकांची प्रदाने गोळा करण्यासाठी कोणतीही एजन्सी आहे का?

एमजीएलने देय तारखेला किंवा त्यापूर्वी गॅसच्या देयांचे प्रदान गोळा करण्यासाठी देयक वितरण आणि संकलन एजन्सीज् नेमल्या आहेत. उशीराच्या बाबतीत, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकाने प्राधान्याने आरटीजीस/एनइएफटी मार्फत देयकांचे प्रदान करावे.

जोडणी खंडित होण्याच्या बाबतीत, मला अर्जाच्या शुल्काचा परतावा मिळू शकेल का?

ग्राहकाच्या बाजूने ग्राहकाने कोणत्याही कारणास्तव यापुढे पीएनजी न वापरण्याचा पर्याय स्वीकारला तर त्या बाबतीत अर्जाचे शुल्क ना-परतावा योग्य आहे.

घरगुती जोडण्यांप्रमाणे जोडण्या तात्पुरत्या खंडित केल्या जाऊ शकतात का?

तात्पुरते खंडित करणे एकतर ग्राहकाच्या विनंतीच्या आधारे किंवा देय तारखेच्या आधी देय रकमेचे प्रदान न करण्यासाठी केले जाऊ शकते. जोडणी तात्पुरती खंडित केली असल्यास, सध्या ग्राहकाला रु. १५००/- चा पुनर्जोडणी आकार प्रदान करावा लागतो.

मी माझ्या जागेचे नूतनीकरण करण्याचे ठरविले असल्यामुळे मी माझ्या मीटरची जागा बदलू शकतो का?

तांत्रिक सुसाध्यतेच्या अधीन, एमजीएलच्या तांत्रिक टीमद्वारे मीटरची जागा बदलली जाऊ शकते. गॅस मीटर योग्य प्रकारे काढण्याची, पुन्हा बसविण्याची आणि जोडण्याची खात्री करण्यासाठी एखाद्याने नूतनीकरणाच्या आधी आणि ते पूर्ण झाल्यानंतर एमजीएलला कळवणे आवश्यक आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीत, मी एमजीएलमधील कोणाशी संपर्क करावा?

कृपया आमच्या इमर्जन्सी हेल्पलाइन क्रमांकः 18002669944 (टोल फ्री) / (022)-68759400 / (022)-24012400 वर कॉल करा जे २४७ आणि वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असतात.

व्यवसाय