कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायगॅस गीझर्स

दृष्टीक्षेप

नॅचरल गॅस फायर्ड इंस्टन्टेनियस वॉटर हीटर्स (गॅस गीझर्स)

इंस्टन्टेनियस वॉटर हीटर्स (म्हणजेच गॅस गीझर्स) हे उपकरण आहे ज्यात पाणी गरम करणे थेट ड्रॉ ऑफवर अवलंबून असते.

ही उपकरणे आयएस १५५५८ किंवा बीएस इएन २६ मानकांच्या सर्व आवश्यकतांनुसार उत्पादन केली जातील आणि त्यांची चाचणी केली जाईल.

गॅस गीझरची कमाल क्षमता आहे

१० लीटर प्रति मिनीट

सामान्य वर्किंग दाब

२१ एबार (जी) चा

उपकरणाला पुढील सुरक्षा वैशिष्ट्य़े असतील (किमान म्हणून):

अ. फ्लेम फेल्युअर शट ऑफ डिव्हाइस: उपकरणात मुख्य बर्नरमध्ये गॅसच्या प्रवेशावर आणि संभवतः ज्वाला विझवलेली असल्याच्या बाबतीत, कोणत्याही इग्नीशन पायलटवर नियंत्रण ठेवणारे फ्लेम फेल्युअर डिव्हाइस असेल.

ब. ओव्हर-हीट प्रोटेक्शन डिव्हाइस: वॉटर हीटरला सोयीस्कर ओव्हरहीट प्रोटेक्शन डिव्हाईस असेल, जे न सोडलेल्या पाण्याचे तापमान ९५° सें. पर्यंत पोचल्यास, गॅसचा पुरवठा बंद करेल. गॅसचा पुरवठा हाताने पुन्हा चालू करावा लागेल.

क. गॅस अँड वॉटर स्टॅबिलिटी डिव्हाइस: उपकरण नळ पूर्ण उघडा असताना २१ एमबार(जी) गॅस इनलेट दाबाने ज्वाला विझवल्याशिवाय, ब्लो ऑफ झाल्याशिवाय किंवा स्ट्राइकिंग बॅक शिवाय आणि सूट निर्माण झाल्याशिवाय काम करेल.

ड. ऑक्सीजन डिप्लीशन सेंसर/इनकंप्लीट कंबश्चन सेफ्टी डिव्हाइस: उपकरणाला एक सेंसर असेल जो प्राणवायू आणि/किंवा कार्बन मोनोक्साइड (CO) एकाच वेळी शोधून काढेल.

गॅस गीझर्स अनधिकृत व्यक्तींमार्फत बसविले जाणार नाहीत. गॅस गीझर बसविण्याच्या गरजेसाठी ग्राहकाने एमजीएल कस्टमर केअरला कॉल करावा. गीझर केवळ चांगली खेळती हवा असलेल्या भागात बसविला जाईल आणि स्नानगृहाच्या आत बसविला जाणार नाही.

व्यवसाय