कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण

अॅसेट इंटिग्रीटी

"अॅसेट इंटिग्रीटी" हा एमजीएलने आपल्या मत्ता आणि संचमांडण्याच्या कणखर आरोग्याची खात्री करण्याचे लक्ष्य ठेवून स्वीकारलेला एक अद्वितीय व्यवस्थापन यंत्रणा पुढाकार आहे.

एमजीएलचा दृष्टीकोन

महानगर गॅस लिमिटेडमध्ये आम्ही गॅस पुरवठा मत्ता त्यांच्या संपूर्ण जीवनकालात कमालीची कामगिरी, विश्वासार्हता आणि सुरक्षितता देण्यासाठी तयार केल्या जातील, उभारल्या जातील, प्रचालन केल्या जातील आणि देखभाल केली जाईल याची खात्री करण्याप्रती वचनबद्ध आहोत.

हे साध्य केले जाईल:

  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संहिता आणि प्रमाणने लागू करून.
  • उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून.
  • धोके, संभाव्य परिणामस्वरुप चुका निश्चीत करून आणि उपशमनाच्या आवश्यक कारवाया हाती घेऊन चूका टाळण्यासाठी प्रभावी तंत्रे आणि यंत्रणांचा सदुपयोग करून.
  • जाळ्यावर काम करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कर्मचारी प्रशिक्षीत आणि सक्षम असतील याची खात्री करून.
  • हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवून, आढावा घेऊन आणि आवश्यक असल्यास बदल करून.
  • सर्व हितसंबंधियांचा सहभाग.
  • या प्रयासाला आवश्यक त्या संसाधनांच्या सर्व तरतूदींचे पाठबळ दिले जाईल.