कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण

एमजीएल एचएसइ धोरण

 

एमजीएल हे आपल्या स्टेकहोल्डर्सना पाइप्ड आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस पुरवत आहे. शून्य इजा हे आमचे उद्दिष्ट आहे कारण इजांना प्रतिबंध करता येऊ शकतो असा आमचा विश्वास आहे. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्वीकारार्ह अशा उत्तम कार्यपद्धतींचे पालन करून आम्ही जबाबदारीपूर्वक आमचा व्यवसाय पार पाडतो. एचएसई कामगिरी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि असुरक्षित कृतींना प्रतिबंध करण्यासाठी हस्तक्षेप करणे व एचएसई लीडरशिप दर्शवून सुरक्षित वर्तनाला बळकटी देणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

एमजीएल येथे, आम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध आहोतः

  • धोके नष्ट करून व व्यवसायविषयक आरोग्य व सुरक्षितता जोखमी कमी करून, कामासंबंधित इजा व स्वास्थ्यावरील वाईट परिणाम अशा गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षित व आरोग्यदायी कार्य स्थिती प्रदान करणे.
  • सामग्री व ऊर्जा यांचा कार्यक्षम वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि ऊर्जा स्रोत, उत्पादने व सेवा विकसित करणे.
  • आपल्या शेजार्‍यांचा आदर करणे आणि आपण ज्या समाजामध्ये वावरत आहोत त्या समाजाप्रती योगदान देणे.
  • एचएसईवरील स्थितीच्या नियतकालिक मूल्यनिर्धारणासाठी संबंधित तंत्रांचा व पद्धतींचा स्वीकार करून आणि सर्व उपाययोजनांचा अवलंब करून, सर्वोत्तम एचएसई कार्यपद्धतींना चालना देण्यामध्ये अग्रेसर भूमिका बजावणे.
  • एचएसई कार्यपद्धतींचे व्यवस्थापन इतर कोणत्याही व्यावसायिक कार्याप्रमाणे करून सर्व निर्णयांमध्ये एचएसईचा समावेश करणे.
  • एचएसई संस्कृतीला चालना देणे ज्यामध्ये सर्व एमजीएल कर्मचारी हे प्रशिक्षण, शिक्षण, सल्‍लामसलत आणि कामगारांचा व त्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग यांद्वारे या बांधिलकीची देवाणघेवाण करतात.

या पद्धतीने, आम्हाला अभिमान वाटेल अशी एचएसई कामगिरी साध्य करण्याचे आणि प्रदूषणाला प्रतिबंध करण्यासह स्थायी विकासासाठी योगदान देण्याखेरीज, स्टेकहोल्डर्सचा विश्वास प्राप्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या धोरणाची अंमलबजावणी करताना, आम्ही पुढील गोष्टी करूः

  • कायदेशीर व तत्सम तरतुदी, एमजीएल जीवनरक्षक नियम यांसह अनुपालनाच्या आबंधनाची खातरजमा करण्यासाठी आणि कामगिरीमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा साध्य करण्यासाठी रचना करण्यात आलेल्या एचएसई व्यवस्थापनाप्रती पद्धतशीर कार्यपद्धती अंगिकारू.
  • एचएसई कामगिरीची मोजणी करण्यासाठी, तिच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, तिचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्ये स्थापित करू आणि वार्षिक अहवालांमध्ये नोंद करू.
  • आमच्या व्यावसायिक भागीदारांची या धोरणाशी सुसंगत राहून एचएसईचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्हाला आवश्यकता आहे.
  • हितसंबंधितासोबत व प्रभावित लोंकासोबत परिणामकारकपणे सहभागी होऊ.
  • कर्मचार्‍यांचे मूल्यमापन, बक्षीस व करिअरचा विकास यांमध्ये एचएसई कामगिरी समाविष्ट करू.

टीप: हे धोरण एमजीएलअंतर्गत कळवण्यात आलेले आहे आणि सर्वसामान्य लोकांना व हितसंबंधिताना उपलब्ध करण्यात आलेले आहे.