काँप्रेसड् नॅचरल गॅस (सीएनजी) काय आहे?
सीएनजी हे पेट्रोल, डिझेल, ऑटो एलपीजी वगैरेंसारख्या इतर ऑटो इंधनांसाठी एक पर्यायी फॉसिल इंधन आहे. नैसर्गिक वायू वाहनाची ऑन बोर्ड क्षमता वाढवण्यासाठी संकुचित केला जातो आणि २०० बारच्या उच्च दाबावर वाहनांना पुरवला जातो.
आज, जवळ जवळ सर्व ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीज् सीएनजीवर चालत आहेत. सीएनजीचा पुरवठा बेस्ट, टीएमटी, एमएसआरटीसी आणि एनएमएमटी सारख्या वाहतूक उपक्रमांनाही केला जातो. त्या व्यतिरिक्त, प्रवासी कार्स, पोस्टल व्हॅन्स, स्कूल बसेस्, कुरियर व्हॅन्स, हलकी आणि जड व्यावसायिक वाहनेसुद्धा सीएनजीचा लाभ घेत आहेत.
पारंपरिक द्रव ऑटो इंधनापेक्षा सीएनजी खूप काटकसरी आणि पर्यावरण-स्नेही आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे तो मुंबई आणि आसपासच्या भागांत सहजपणे उपलब्ध आहे त्यामुळे तो मुंबईचे पहिल्या पसंतीचे ऑटो इंधन झाले आहे.
सीएनजी विषयीच्या वस्तुस्थिती
काटकसरी
- खिशाला सहज परवडणारा.
- सीएनजी कमी खर्चात उत्तम कामगिरी देतो कारण तो तुमच्या वाहनाला अधिक चांगले माइलेज देतो.
- सीएनजी क्रंक केस ऑईल दूषीत किंवा सौम्य करत नाही त्यामुळे तुमच्या इंजिनाला वाढीव आयुष्य मिळते.
सहजपणे उपलब्ध
- एमजीएलची मुंबई, मीरा-भायंदर, ठाणे आणि नवी मुंबईत १००० हून अधिक वाटप केंद्रे असलेली सुमारे १९० सीएनजी भरणा केंद्रे आहेत.
- एमजीएल आपले सीएनजीचे जाळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल वगैरे सारख्या नवीन ठिकाणीही विस्तारत आहे.
- मुंबई व्यतिरिक्त, सीएनजी ४१ शहरांमध्ये उपलब्ध आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात तो ३०० हून अधिक शहरात उपलब्ध असेल.
- सध्या सीएनजी कॉरीडॉर मुंबईला पुणे, सुरत आणि अहमदाबाद या शहरांशी जोडतो. पेट्रोल कार/टॅक्सीच्या बाबतीत, दुहेरी इंधनाचा पर्याय उपलब्ध आहे जो आवश्यक असेल तेव्हा सीएनजी आणि पेट्रोलदरम्यान बदल करण्यात मदत करतो.
निसर्ग-स्नेही
- सीएनजीच्या वापरामुळे वाहनाच्या एक्झॉस्टमधून उत्सर्जित होणाऱ्या घातक कार्बन डायोक्साइड, कार्बन मोनोक्साइड आणि इतर तरंगते कण यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करतो.
- तो ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करतो.
- बिन-विषारी, गंज न पकडणारा, कर्करोगाला कारण न होणारा आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य सुधारतो.
सुरक्षित आणि विश्वासार्ह
- सीएनजी हवेपेक्षा हलका आहे आणि त्यामुळे कोणत्याही धोकादायक पद्धतीने जमा न होता पटकन विखरवून जातो.
- सीएनजीची ज्वलनशीलता अत्यंत कमी आहे त्यामुळे तो इतर इंधनांपेक्षा अधिक सुरक्षित ठरतो.
- सीएनजीचे इग्नीशन तापमान इतर इंधनांच्या पेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे अपघाताने किंवा उत्स्फूर्तपणे ठिणगी पडण्याची शक्यता कमी होते.