कंपनीने तिच्या सीएसआर धोरणात कंपनीज् (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी) नियम,२०१४ द्वारे तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी मिळते जुळते होण्यासाठी २०१४ मध्ये सुधारणा केली आहे.
कंपनीच्या दूरदृष्टीनुसार, तिचे सीएसआर पुढाकार तिच्या पर्यावरण संरक्षण, निरोगी आणि अज्ञानमुक्त नागरिकांचा विकास, सामाजिक उन्नती आणि तिच्या सेवा, वर्तन आणि सामाजिक पुढाकारांमार्फत शाश्वत समुदाय विकास यातील तिच्या योगदानाला पूरक असतील.
व्यवस्थापकीय संचालक, तांत्रिक संचालक आणि एक स्वतंत्र संचालक, जो समितीचा अध्यक्ष आहे, यांची एक त्रि-सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे.
व्यावसायिक कार्ये, लक्ष्ये आणि धोरणे नियोजित समुदाय विकास कार्यक्रमाशी एकात्मिक करणे. समाजाचे शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणविषयक जागरुकता या मार्फत परिवर्तन करण्यात एक भूमिका बजावणे.
धोरणात्मक आणि शाश्वत सीएसआर प्रोग्राम्सच्या अंमलबाजवणीमार्फत कंपनीची सीएसआर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, एमजीएल आधीच्या तीन लागोपाठच्या वित्तीय वर्षांतील तिच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या २% चे तिचे वार्षिक सीएसआर बजेट म्हणून वाटप करेल. कंपन्या अधिनियमाच्या अनुसूची VII मध्ये विनिर्दिष्टीत जोर देण्याच्या क्षेत्रावर कार्यांचे लक्ष केंद्रीत असेल.
हे धोरण हाती घेण्याच्या सीएसआर कार्यांची अंमलबजावणी, संनियंत्रण आणि मूल्यमापन यांची रुपरेषा आखून देते.