कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमसीएसआरसीएसआर पुढाकार

सबलीकरण

एमजीएलचा असा विश्वास आहे की एखादयाला त्याची पूर्ण क्षमता प्राप्त करण्यात आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम करणे म्हणजेच त्यांना सबळ करणे आहे. त्यामुळे एमजीएलच्या सबलीकरण मोहीमेला एखाद्याला स्वतःचा शोध घेण्यास सक्षम करण्याची दिशा देण्यात आली आहे.

एमजीएल हुनर हा एमजीएलचा एक पुढाकार आहे जो युवकांची त्यांचा स्वतःचा सखोल शोध घेण्यात मदत करणारी रोजगार अभिमुख कौशल्ये वाढविण्यासाठी आहे.

एमजीएल एका तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला मदत करत आहे जी समाजातील दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यंना अल्पकालीन अभ्यासक्रम देऊ करते. समाजाच्या एकाकी पडलेल्या वर्गातील तरुणांना सक्षम आणि सबल करण्याच्या त्यांच्या दीर्घ शोधात पूरक ठरण्यासाठी एमजीएलने या संस्थेबरोबर भागीदारी केली आहे.

एमजीएलच्या मदतीत प्रशिक्षण केंद्रांच्या संपूर्ण पायाभूत संरचनांचे श्रेणीवर्धन, प्रशिक्षण साधनांचे श्रेणीवर्धन, प्रशिक्षण पाठ्यक्रमाचे श्रेणीवर्धन, नवीन पाठ्यक्रम तयार करणे आणि तुकड्या चालविण्यासाठी प्रचालनीय पाठबळ यांचा समावेश आहे. आरएसी आणि गॅस प्लंबिंगवर एक नवीन अभ्यासक्रम रोजगार क्षमतेच्या आधारावर सुरू करण्यात आला आहे. या व्यवसायात दर वर्षी ७५ तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल.

आरएसी आणि गॅस प्लंबिंगची पहिली तुकडी, जून २०१६ मध्ये बाहेर पडली आणि १००% विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात यश आले.

विविध रोजगार अभिमुख व्यवसायांवर एमजीएल अल्पकालीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करत आहे. जनरल ड्यूटी असिस्टन्ट (नर्सिंगमध्ये) कस्टमर केअर एक्झीक्युटीव आणि गॅस प्लंबिंग अशा अभ्यासक्रमांत २०० पेक्षा जास्त तरुणांना प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे.