सर्वसाधारण बिलिंगची पद्धत दर दोन महिन्यांनी गॅसच्या वापरासाठी देयक तयार करणे अशी आहे. पहिले देयक मीटर रिडींगप्रमाणे गॅसच्या प्रत्यक्ष वापरावर असते. दुसरे देयक निर्धारित तत्त्वावर असते. त्यानंतर बिलिंगच्या चक्राची प्रत्यक्ष रिडींग आणि निर्धारित रिडींग अशी एकाआड एक पुनरावृत्ती केली जाते.
आधीच्या/बंद रिडींग नंतरचे अक्षर (A) दर्शविते की हे एक निर्धारित रिडींग आहे. जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष रिडींग कोणत्याही कारणाने उपलब्ध नसते, तेव्हा देयक अंदाजे तत्त्वावर तयार केले जाते. या बाबतीत, देयकात दिलेल्या आधीच्या/बंद रिडींग नंतर अक्षर (E) दर्शविले जाते. अंदाजासाठी, शेवटच्या ६ देयकांची सरासरी घेतली जाते. ज्या बाबतींमध्ये गॅसचा वापर एक वर्षापेक्षा कमी आधी सुरू झाला आणि ३ पेक्षा कमी प्रत्यक्ष देयके तयार करण्यात आली, तर सरासरी गॅस वापरावरून अंदाज केला जातो.
लक्षात ठेवा: तुमच्या देयकावर बंद रिडींगनंतर जर (A) किंवा (E) काहीच नमूद केलेले नसेल तर तुमचे देयक प्रत्यक्ष मीटर रिडींगवर आधारित आहे. प्रत्यक्ष देयकाच्या मागच्या बाजूवर, मीटरचे चित्र दिले जाते.
जेवढा तुम्ही अधिक वापराल, तेवढा दर जास्त:
सध्या (जुलै २०१६ मध्ये असल्याप्रमाणे) दराचे ३ टप्पे आहेत.
टप्पा I = रु. २१.९६/एससीएम, टप्पा II = रु. २६.०१/एससीएम, टप्पा III = रु. ३३.३६/एससीएम.
(एससीएम – स्टँडर्ड क्युबिक मीटर) . टप्पा III चे दर दर महिन्यागणिक बदलतात.
एसएपी मार्फत घरगुती पीएनजी बिलिंगचे सर्वसाधारण उदाहरण | ||
सध्या (१९.०७.२०१६ रोजी असल्याप्रमाणे): टप्पा I = रु. २१.९६/- एससीएम, टप्पा II = रु. २६.०१/- एससीएम आणि टप्पा III = रु. ३३.३६/- एससीएम. गृहितकः मुंबईतील एका कल्पित ग्राहकासाठी. १९.०७.२०१६ रोजी बंद रिडींग = १००; १९.०५.२०१६ रोजी आधीचे रिडींग = १ | ||
६१ दिवसांच्या(१९.०५.२०१६ ते १९.०७.२०१६) बिलिंग कालावधीत गॅसचा वापर | १००-१ = ९९ एससीएम (रोजचा सरासरी वापर = ९९/६१ = १.६२ एससीएमडी) | |
टप्पा - I | ६१ दिवसांच्या बिलिंग कालावधीत गॅसचा वापर (०.६० एससीएमडी पर्यंत). | ०.६० x ६१ = ३६.६० एससीएम (टप्पा १ वापर) |
बिलिंगची रक्कम (@ रु. २१.९६/- एससीएम) | ३६.६० X २१.९६ = रु. ८०३.७३ (टप्पा I ची रक्कम) | |
टप्पा – II | ६१ दिवसांच्या बिलिंग कालावधीत गॅसचा वापर (०.६१ एससीएमडी आणि १.५० एससीएमडीच्या दरम्यान). | ०.९० X ६१= ५४.९० एससीएम (टप्पा II वापर) |
बिलिंगची रक्कम (@ रु. २६.०१/- एससीएम) | ५४.९० X २६.०१ = रु. १४२७.९५ (टप्पा II ची रक्कम) | |
टप्पा - III | ६१ दिवसांच्या बिलिंग कालावधीत गॅसचा वापर (१.५१ एससीएमडीच्या वर) | ०.१२ x ६१ = ७.३२ एससीएम (टप्पा III वापर) |
बिलिंगची रक्कम (@ रु. ३३.३६/- एससीएम) | ७.३२ X ३३.३६ = रु. २४४.२० (टप्पा III ची रक्कम) | |
म्हणून देयकाची एकूण रक्कम (कर/थकबाकी/समायोजन, वगैरे वगळून = टप्पा I, II आणि III च्या रकमांची बेरीज. | ८०३.७३ + १४२७.९५ +२४४.२० = रु. २४७५.८८ |
एसएपीदद्वारे गॅसच्या वापरासाठी लागू असलेले पूर्णांकात करणे केले जाते.
निर्धारित आणि अंदाजित देयकांच्या बाबतीत, बंद मीटर रिडींगच्या नंतर अनुक्रमे (A) आणि (E) नमूद करण्याबरोबरच, देयकांच्या मागच्या बाजूवर तत्संबंधी संदेश दिला जातो. अशा बाबतीत मीटरचे चित्र अर्थातच दिले जात नाही.