कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायव्यवसाय-घरगुती पीएनज

दृष्टीक्षेप

एमजीएलपाशी मुंबई आणि तिच्या आसपासच्या भागांत नैसर्गिक वायू वितरणाच्या जाळ्याचा पाया घालण्याचा मान आहे. कार्बन स्टील (सीएस) आणि पॉलीएथीलीन (पीइ) पाइपलाइनच्या बनलेल्या आमच्या 6534 किमी. पेक्षा जास्त विस्तृत जाळ्यामार्फत 2.16 दशलक्षाहून अधिक घरगुती ग्राहक जोडलेले आहेत. घरगुती पीएनजी स्वयंपाक, आणि पाणी गरम करणे या सारख्या विविध हेतूंसाठी वापरला जातो. त्याचा वापर रुग्णालये, नर्सिंग होम्स, हॉटेल्स, फ्लाइट किचन्स, रेस्टॉरंटस्, प्रार्थना स्थळे वगैरेंकडून सुद्धा केला जातो. पीएनजी कार्यक्षम, अ-प्रदूषक आणि तुलनेने काटकसरी असल्याने सर्व क्षेत्रातील बहुतेक इंधनांच्या गरजांची पूर्तता करतो.

पीएनजीचे वेगवेगळे उपयोग

पाककला

पाणी तापविण्याची

रुग्णालये
आणि नर्सिंग होम्स

फ्लाइट किचन

हॉटेल्स आणि
रेस्टॉरन्टसाठी

प्रार्थनास्थळे

पाइपड् नैसर्गिक वायूचे लाभ

 • सोयीस्करपणा- वायू सातत्याने यंत्रणेत भरला जात असतो, त्यामुळे सिलींडर रिफील करणे/बदलणे ही कटकट नाही, तो पाइपमधून येत असल्यामुळे साठविण्यासाठी कोणतीही जागा लागत नाही, म्हणून हाताळायला सोपा आणि सुरक्षित.
 • काटकसरी - इतर कोणत्याही पारंपरिक इंधनापेक्षा उच्चतम बचत.
 • सुरक्षित - आंतरराष्ट्रीय सुरक्षितता प्रमाणनांनुसार कणखर यंत्रणा आणि प्रक्रिया ज्या जगातील उत्तम आहे त्याच्याशी बरोबरी करतात, वापरल्या जातात. पीएनजी हवेपेक्षा हलका असल्यामुळे सहज विरून जातो आणि उत्स्फूर्त ज्वलनशीलता टाळतो.
 • सतत, विश्वासार्ह पुरवठा - एमजीएलचा १००% विश्वासार्ह वायू पुरवठ्याचा विक्रम आहे. मुंबईतील जुलै २००५ मधील पूरातही, जेव्हा बहुतेक इतर उपयुक्त सेवा कोलमडल्या होत्या, पीएनजीचा पुरवठा विनाव्यत्यय चालू होता.
 • निसर्ग-स्नेही - पीएनजीच्या वापराने लोकांचे आरोग्य सुधारते. तो महानगराच्या आत बाटलीबंद वायूची वाहतूकही कमी करतो ज्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी होते आणि रस्त्यावर सुरक्षितता वाढते.

पीएनजीची रचना

प्रति मॉलीक्युल केवळ एक कार्बन आणि चार हायड्रोजन अणू (मीथेन) असलेल्या नैसर्गिक वायूमध्ये हायड्रोकार्बन्स (जवळ जवळ ९५% मीथेन आणि बाकी इतर हायड्रोकार्बन्स) आहेत. त्याचे कॅलरीफिक मूल्य साधारणपणे ८००० केसीएएल/एम३ ते ९००० केसीएएल/एम३ च्या दरम्यान असते, नैसर्गिक वायूमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं गुणोत्तर सर्वात कमी आहे, आणि त्यामुळे तो पूर्णपणे जळतो, आणि त्याला अधिक पर्यावरण-स्नेही इंधन बनवतो.

 • भौतिक स्थिती वायू
 • रंगरंगहीन
 • गंध गंधहीन (वासातून सहजपणे लक्षात येणयासाठी वास येणारे म्हणून एथील मरकॅप्टन टाकलेले असते)
 • विलय बिंदु-१८२° सें.
 • उत्कलन बिंदु-१६१.५° सें.
 • बाष्प घनता ०.६ ते ०.७ (हवेच्या संबंधात)
 • ज्वलनशीलता गुणोत्तर हवेतील राशीद्वारे५ ते १५%
 • ऑटो इग्नीशन तापमान५४०° सें.

 

व्यवसाय