कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमग्राहक विभागकस्टमर कनेक्टतुमच्या देयकाचे प्रदान कसे कराल

एनएसीएच

(वजावट आदेश प्रपत्र एनएसीएच) एक वेळचा आदेश (ओटीएम)

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) उपयुक्त सेवा उद्योगाच्या संबंधातील प्रदानांच्या वसूलीसाठी सेवा पुरवण्याकरिता एनएसीएच (नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस) अधीन पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) ला अधिकार दिला आहे. कालांतराने इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम (इसीएस) ची जागा घेईल.

इसीएसमध्ये आदेश देणाऱ्या ग्राहकाला शाखेला भेट द्यावी लागते आणि शाखा व्यवस्थापकाची किंवा त्याच्या प्रतिनिधीची सही मिळवावी लागते. तर एनएसीएचच्या बाबतीत प्रपत्र भरून एमजीएलकडे पाठवणे आवश्यक असते, जी एनपीसीएलने तैनात केलेल्या यंत्रणेमार्फत एमजीएल बँकर्सच्या स्रोतांचा वापर करेल आणि ते पोर्टलमध्ये अपलोड करेल. पोर्टल स्वयंचलित पद्धतीने तुमच्या बँकरला तसा निर्देश देईल आणि तुमचा बँकर त्याची इलेक्ट्रॉनिक मार्गाने पुष्टी करेल.

एक अनोखा युएमआरएन क्रमांक देण्यात येईल जो संदर्भ असेल. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकाच्या बँकर्सकडून स्वीकार करायला सुमारे २० ते ३० दिवस लागतात, तथापि कालांतराने त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार इसीएस खंडित केली जाईल, त्यामुळे सरकार आणि आरबीआयच्या पुढाकारांशी सुसंगत राहण्याच्या दृष्टीने आम्ही एनएसीएच (ओटीएम) प्रपत्रे वापरात आणली आहेत आणि ते एमजीएलच्या वेबसाइटवर अपलोड केले आहे. तुम्ही प्रपत्र डाउनलोड करू शकता आणि ती भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता.

महानगर गॅस लिमिटेड
सेंट्रम हाउस, ४था मजला, सीएसटी रोड, कालीना,सांताक्रुझ (पू), मुंबई 400 098

कृपया प्रपत्र भरताना सूचनांचे पालन करा, आणि तपशील वाचनीय आणि मशिनने वाचता येईल अशा पद्धतीने भरा ज्यामुळे आम्हाला विनंतीवर प्रक्रिया करणे शक्य होण्याची खात्री होईल.

आम्हाला वेळ द्या आणि युएमआरएन क्रमांकाची पुष्टी केल्यानंतर तो एसएमएस आणि इमेल द्वारा तुमच्या नोंदजणीकृत मोबाइल क्रमांकावर आणि इमेल आयडीवर पाठवला जाईल, नंतरची देय होणारी देयके एसीएच सुविधेचा वापर करून वसूली करून समायोजित केली जातील.

तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला वरील पत्त्यावर लिहू शकता आणि तुम्हाला मदत करण्यात आम्हाला आनंदच होईल.

ग्राहक विभाग