कॉल 68674500 / 61564500

Mahanagar Gas

होमव्यवसायसीएनजी

कारची काळजी

सीएनजी कारची देखभाल

वाहनाच्या अधिक चांगल्या कामगिरीसाठी दर ६ महिन्यांनी करणे हितावह असलेल्या सीएनजी वाहनाच्या सर्विसिंग आणि दुरुस्तीच्या दरम्यान पुढील सावधगिऱ्यांचे पालन केले पाहिजे.

  • सिलींडरच्या कोणत्याही भागाला(१.५ मीटरच्या आत) वेल्डिंग किंवा उष्णता देण्याची गरज असलेली दुरुस्ती केली जात असलेल्या वाहनाच्या बाबतीत, आधी सिलींडर रिकामा करणे.
  • इंधनाच्या यंत्रणेतील गळतीच्या बाबतीत, वाहन ठिणगी किंवा आगीच्या कोणत्याही स्रोतापासून ६ मीटरच्या आत उभे न करणे.

करावे आणि करू नये!

ट्रबल-शूटिंग मार्गदर्शनासाठी नेहमीच पुरवठादाराच्या कीट मॅन्यु्अलचा संदर्भ घ्या. ते स्वतः करू नका.

सीएनजी सिलींडरच्या जागी एलपीजी, किंवा प्रोपेन किंवा इतर कोणताही सिलींडर बसवू नका. ते बेकायदेशीर आणि असुरक्षित आहे.

कोणत्याही सीएनजी गळतीची आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी, वापरकर्त्यांना सीएनजी यंत्रणेतील सिलींडर वाल्व, मास्टर शट-ऑफ वाल्व आणि बर्स्ट डिस्कच्या जागेची आणि कामाची माहिती असली पाहिजे. यंत्रणेचा अभ्यास करा आणि तुमच्या मेकॅनिकला हे भाग तुमच्यासाठी शोधून दाखवायला सांगा.

कीट फिटमेंट करणाऱ्या रिट्रोफिटरला या कामांची तुमचे समाधान होईपर्यंत प्रात्यक्षिक दाखविणे शक्य झाले पाहिजे. पेट्रोल यंत्रणा चांगल्या काम करण्याच्या स्थितीत राहण्याची खात्री करण्यासाठी वाहन प्रसंगी पेट्रोलवर चालविणे हितावह ठरेल.

सीएनजी सिलींडरच्या जागी एलपीजी, किंवा प्रोपेन किंवा इतर कोणताही सिलींडर बसवू नका. ते बेकायदेशीर आणि असुरक्षित आहे.

तुमच्या वाहनासाठी इतर सावधगिऱ्या:

  • वाहनाच्या इतर उपसाधनांबरोबरच तुमच्या वाहनात बसविलेल्या सीएनजी कीटचा सुद्धा विमा घ्यावा. मोटरिस्टने विमा कंपनीला सीएनजी यंत्रणेला विमा पुरविण्याची अधिसूचना द्यावी, ज्यासाठी विमा कंपनी अतिरिक्त प्रिमियम आकारू शकेल. मोटरिस्टने अतिरिक्त सीएनजी कीट यंत्रणेसाठी विमा छत्र घ्यावे.
  • विद्यमान सरकारी नियमनांनुसार, वाहन सीएनजीमध्ये रुपांतरित केल्यानंतर सुद्धा प्रदूषण तपासणी आणि प्रदूषण प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
  • प्रेशराइजड् गॅस सिलींडर हा बहुधा वाहनाचा सर्वात कणखर घटक आहे. टक्करींमध्ये संपूर्णपणे नष्ट झालेल्या वाहनांमध्ये सुस्थितीत असलेला गॅस सिलींडर हा एकमेव ओळखता येणारा घटक असल्याचे दिसून आले आहे. टक्करींच्या परिणामांमुळे सिलींडरला भोक पडेल अशी शक्यता नाही.
  • गळती होणाऱ्या सिलींडरपासून आगीच्या धोक्याच्या बाबतीत, आजच्या घडीला आमच्यापाशी केवळ अनुभव आहे जे दर्शवितो की अशी एखादी घटना घडण्याची शक्यता नाही. गळती होणाऱ्या सिलींडरमुळे आग लागण्याची जोखीम फार कमी असणार कारण संपूर्ण जगात ०३ दशलक्ष सीएनजी वाहने आहेत ज्यांना अशी समस्या अनुभवाला आलेली नाही.
  • नैसर्गिक वायू हवेपेक्षा हलका असतो आणि पाइप किंवा कंटेनरमधून गळती होण्याच्या असंभव प्रसंगात हा वायू वरच्या दिशेने पटकन विरून जाईल. पेट्रोल आणि एलपीजीच्या बाबतीत, बाहेर पडणारे बाष्प हवेपेक्षा जड असल्यामुळे त्याचा जमिनीच्या दिशेने ओढले जाण्याकडे कल असेल.

व्यवसाय